रंजित चिंचखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : रेतीघाटांची मुदत संपल्यानंतर उत्खननास प्रतिबंध लावण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरु असून रेतीचा साठा केला जात आहे. चुल्हाड येथे तर आठ ठिकाणी रेती तस्करांनी डंपींग यार्ड तयार केल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले.सिहोरा परिसरात वैनगंगा आणि बावनथडी नदीचे विशाल पात्र आहे. या नद्यात रेतीचा मोठा साठा आहे. गतवर्षी लिलाव करण्यात आले. परंतु यंदा अद्यापही लिलावाला परवानगी देण्यात आली नाही. मात्र रेती घाटातून खुलेआम तस्करी केली जात आहे. मध्यप्रदेशातील शिंगोरी घाटाच्या रॉयल्टीवर वाहतूक केली जात आहे. आता तस्करांनी रेतीची राजरोस डंपींग सुरु केले आहे. ५०-५० ट्रक रेती एका ठिकाणी साठवून ठेवण्यात आली आहे. चुल्हाडमध्ये असे आठ डंपींग यार्ड आहेत. या ठिकाणावरून रेतीची विक्री करण्यात येते. महसूल विभागाला हा सर्व प्रकार माहित असला तरी कारवाई मात्र केली जात नाही. रेतीचा साठा नेमका कुणाचा आहे हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कुणीही नाव सांगण्यात तयार नव्हते.रेतीघाटाचे लिलाव झाले नाही. त्यामुळे घरकुलांना रेती मिळत नाही. तर दुसरीकडे अवैध रेतीची डंपींग केली जात आहे. माफियांना रेती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे.-मोतीलाल ठवकर,जिल्हाध्यक्ष भारतीय किसान संघ
चुल्हाड येथे अवैध रेतीचे आठ डम्पिंग यार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 01:28 IST
रेतीघाटांची मुदत संपल्यानंतर उत्खननास प्रतिबंध लावण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरु असून रेतीचा साठा केला जात आहे. चुल्हाड येथे तर आठ ठिकाणी रेती तस्करांनी डंपींग यार्ड तयार केल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले.
चुल्हाड येथे अवैध रेतीचे आठ डम्पिंग यार्ड
ठळक मुद्देअवैध उपसा सुरुच : वैनगंगा आणि बावनथडी नदीत मोठ्या प्रमाणात उत्खनन