शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूतीदरम्यान बाळाच्या पायाचे हाड मोडले

By admin | Updated: September 23, 2016 00:37 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बाळाच्या पायाचे हाड मोडले.

डॉक्टरांचा निष्काळजीपणा : मोफत उपचार करण्याची मागणीमोहाडी : जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बाळाच्या पायाचे हाड मोडले. यात बाळाच्या भविष्याचा प्रश्न उपस्थित झाला असून रुग्णालय प्रशासनाने मात्र हात वर केल्याने त्या गरीब शेतकऱ्यावर संकट ओढवले आहे. बाळाच्या पायाची शस्त्रक्रीया रुग्णालय प्रशासनाने नि:शुल्क करून द्यावी, निष्काळजीपणाने प्रसुती करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी प्रेमरतन येळणे यांनी पत्रपरिषदेद्वारे केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले आहे.जवळील कुशारी येथील शारदा प्रेमरतन येळणे यांना पहिल्या प्रसुतीसाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे २७ आॅगस्टला भरती करण्यात आले. दोन दिवस ठेवल्यानंतर २९ आॅगस्ट रोजी १२ वाजताच्यादरम्यान सिझर करून प्रसुती करण्यात आली. तीन चार तासानंतर बाळाच्या डाव्या पायाच्या मोडीवर सुझन असल्याचे लक्षात आले. दुसऱ्या दिवशी तेथेच एक्स-रे काढण्यात आला. बाळाच्या कमरेजवळील पायाकडील भागात हाडे तुटले असल्याचे निदर्शनात आले. डॉक्टरांनी थातूर माथूर उपचार करून पाच सप्टेंबर रोजी रुग्णालय सुटी दिली. मात्र बाळाच्या पायाला फायदा लागला नसल्याने सुटी दिल्यानंतर दोन दिवस रुग्णालयात ठेवले. तेथील डॉक्टरांनी नागपुरला नेण्याचा सल्ला दिला. नागपूर येथील संकेत रुग्णालय सिताबर्डी येथे नेल्यावर त्यांनी पायाचे बेल्ट तयार करून दिले. मात्र त्या बेल्टने सुद्धा पायाला फायदा झाला नाही. जिल्हा शल्य चिकित्सकाला भेटण्यासाठी गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी हाकलून लावले. मोहाडी येथील डॉ. गिरीपुंजे यांना दाखविले असता त्यांनी एक्सरे काढला असता मांडीजवळ दोन ठिकाणी फॅक्चर असल्याने सांगितले तसेच प्रसुती करताना ओढतान केल्याने असे फॅक्चर होवू शकते, असे सांगितले. रुग्णालय प्रशानाला प्रसुती कोणत्या डॉक्टरने केली हे विचारले असता तसेच बाळंतपणाची फाईल दाखविण्याची विनंती केली असता अर्जदार गरीब शेतमजूर असल्याने त्याला हाकलून लावण्यात आले. अर्जदार हा गरीब शेतमजूर असल्याने त्या बाळाचा उपचार करण्यास असमर्थ आहे. लवकर त्या बाळाचा उपचार करण्यात आला नाही तर त्या बाळाला संपूर्ण आयुष्य अपंगत्वाचे जीवन जगावे लागणार आहे, असेही येळणे यांचे म्हणने आहे. प्रसुती करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करावी तसेच बाळाचा उपचार नि:शुल्क करावा, अशी मागणी पत्र परिषदेत शारदा येळणे व प्रेमरतन येळणे या दांम्पत्यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांच्याशी सभ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. (शहर प्रतिनिधी)