शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

मांडवीत चार हजार ब्रास रेतीचा डम्पींग यार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:51 PM

वैनगंगा नदीचे काठावर असणाऱ्या मांडवी गावाचे हद्दीत ४ हजार ब्रास रेतीचा अनधिकृत डम्पींग यार्ड तयार करण्यात आले. नद्यांचे काठावरील अनेक उम्पींग यार्डचा हा बाप असल्याचा अनुभव येत आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने रविवार आणि शनिवार असे दोन दिवस सिहोरा परिसरात शोध मोहिम राबविली असता अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देरेती माफियांची शक्कल : रात्री उशिरापर्यंत ट्रकमधून होतेय वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा नदीचे काठावर असणाऱ्या मांडवी गावाचे हद्दीत ४ हजार ब्रास रेतीचा अनधिकृत डम्पींग यार्ड तयार करण्यात आले. नद्यांचे काठावरील अनेक उम्पींग यार्डचा हा बाप असल्याचा अनुभव येत आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने रविवार आणि शनिवार असे दोन दिवस सिहोरा परिसरात शोध मोहिम राबविली असता अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.सिहोरा परिसरात वैनगंगा आणि बावनथडी या दोन नद्यांचे विशाल पात्र आहे. या नद्यांचे पात्रात असणाऱ्या रेतीला मोठी मागणी व पसंती विदर्भ आणि नजिकच्या मध्यप्रदेशात आहे. या परिसरात अनेक रेतीचे घाट असले तरी एकही घाटांचा लिलाव झालेला नाही. यामुळे गाव स्तरावर माफियांचा उदय झाला आहे. नदीचे पात्रापासून महसूल विभागाचे यंत्रणेच्या निदर्शनास येणार नाही या करिता काही अंतरावरील गावात रेतीची साठवणूक करण्यात येत आहे. यामुळे रेतीचे वाहतूक करणारी ट्रक दिवसभर राज्य मार्गावर दिसत नाही.सायंकाळी ते रात्री उशिरापर्यंत अनेक ट्रक रेतीची वाहतूक करताना दिसून येत आहेत. सोंड्या, वारपिंडकेपार, महालगाव, ब्राम्हणटोला, बपेरा, देवरी देव, चुल्हाड, सिंदपुरी, मोहाडी खापा, परसवाडी, रेंगेपार, तामसवाडी, मांडवी आणि सितेपार गावाचे हद्दीत रेतीचे साठवणूक असणारे अनधिकृत डम्पींग यार्ड तयार करण्यात आली आहे. या गवाात असणारे डम्पींग यार्डाचे ठिकाण वारंवार बदल करण्यात आल्याचे दिसून आले आहे. परसवाडा गावातील नाल्यालगत रेतीची साठवणूक करण्यात आली आहे. मांडवी गावात नदीचे विशाल पात्र आहे. या गावातील नदी पात्राचे शेजारी खाजगी जागेत ४ हजार ब्रास रेतीचे साठवणूक असणारा एकच डम्पींग तयार करण्यात आलेला आहे. डम्पींग यार्ड अनधिकृत असला तरी खाजगी जागेत आहे. हजारो ब्रास रेती असल्याने लिलाव पद्धतीत कारवाईची प्रतिक्षा रेती माफियांना आहे. वाढते रेतीचे डम्पींग यार्ड उभारले जात असताना निश्चितच महसूल विभागाचे वरिष्ठ यंत्रणेला तारेवर घेतले जात आहे.परंतु यंत्रणेचा दुवा आणि कणा असणारा तलाठीच आंधळ्याची भूमिका घेत आहे. या शिवाय त्याचाही सहभाग असल्याची गावात आरोप होत आहे.४ हजार ब्रास रेतीची साठवणूक करण्यात आली असताना महसूल विभागाचे नजरेतून सुटले असल्याचे दिसून आले आहे. परंतु माफियांचे कथणी आणि करणीचा हाकनाक फटका काहींंना बसत आहे.‘लोकमत’ प्रतिनिधीने नदीचे काठावर फेरफटका व शोध मोहीम राबविली असता धक्कादायक प्रकार दिसून आले. नदीचे काठालगत असे डम्पींग यार्ड तयार करण्यात आले आहे, अर्ध शतक डम्पींग यार्ड असताना माफियाचे विरोधात कारवाई केली जात नाही. परंतु घरकुलधारक लाभार्थ्यांना रडारवर घेतले जात आहे. नद्याचे काठावर रेती माफियांचे साम्राज्य निर्माण झाला आहे. रेतीच्या चोरीने गावकरी गस्त झाले आहे. रात्रभर गावातून वाहने धावत असल्याने गावकऱ्यांची झोप होत नाही.तासमवाडी घाटावरून रेतीची चोरी बंद करण्यासाठी तक्रार दिली असता पोलीस चौकी देणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु स्थिती जैसे थे आहे.-अनिल वासनिक,ग्रामपंचायत सदस्य, तामसवाडी.