शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांमुळे जिल्हा परिषद शाळांचे भवितव्य धोक्यात

By admin | Updated: May 26, 2017 01:56 IST

माध्यमिक शाळांमध्ये शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांचा अतिरिक्त होण्याचा प्रश्न भेडसावत आहे.

पर्यवेक्षीय यंत्रणा अपुरी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह, पवनीतील स्थिती चिंताजनकअशोक पारधी । लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : माध्यमिक शाळांमध्ये शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांचा अतिरिक्त होण्याचा प्रश्न भेडसावत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा केंद्र प्रमुख पदवीधर शिक्षक व सहायक शिक्षक यांच्या रिक्त पदामुळे ओस पडण्याची शक्यता बळावली आहे. विद्यार्थ्यांचा प्रवेश झालाच तर रिक्त पदामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.पवनी तालुक्याचा विचार केल्यास जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा २, प्राथमिक शाळा १३८ त्यापैकी इयत्ता १ ते ५ च्या ९६ व इयत्ता १ ते ७ च्या ३२ शाळा आहेत. या शाळांचा पर्यवेक्षण प्रशासकीय कार्यभार पाहण्यासाठी गटशिक्षणाधिकारी, दोन वरिष्ठ विस्तार अधिकारी, दोन कनिष्ठ विस्तार अधिकारी व दहा केंद्र प्रमुखांची पदे मंजूर आहेत.त्यापैकी गटशिक्षणाधिकारी म्हणून सुवर्णलता धोडेस्वार कार्यरत आहेत. मात्र वरिष्ठ विस्तार अधिकारी व कनिष्ठ विस्तार अधिकारी प्रत्येकी एक पद रिक्त आहे. किमान १० शाळांचा गट करून केंद्र निश्चित करण्यात आलेले आहेत. एकूण १० केंद्र असले तरी कित्येक वर्षापासून सावरला, बेटाळा व कोंढा केंद्रातील केंद्र प्रमुखाचे पद रिक्त आहे तर जिल्हा परिषद भंडारा येथे झालेल्या कार्यशाळेत नेरला येथे कार्यरत केंद्र प्रमुखाची प्रशासकीय बदली करण्यात आलेली आहे. त्यामुळे पंचायत समिती अंतर्गत १० केंद्रात केवळ ६ केंद्रप्रमुख राहणार असून ४ जागा रिक्त झाल्याची माहिती आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या संदर्भात प्रश्न गंभीर झालेला आहे. उच्च श्रेणी मुख्याध्यापकाचे १५ पद मंजूर आहेत. त्यापैकी ८ कार्यरत तर ७ रिक्त आहेत. त्यापैकी ४६ पद कार्यरत तर २१ पद रिक्त आहेत. सहायक शिक्षकांची ३३ पद मंजूर आहेत. त्यापैकी ३२० कार्यरत असून १९ पद रिक्त आहेत. आंतरजिल्हा बदलीसाठी तालुक्यातून २५ ते ३० शिक्षकांनी आॅनलाईन अर्ज भरलेले आहे ही माहिती पालकांपर्यंत पोहचलेली आहे. शाळेला शिक्षकच राहणार नसेल तर पालक त्यांच्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत कशासाठी प्रवेश घेणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. सन २०१६-१७ चे सुरूवातीला शिक्षकांचे मागणीसाठी पालकांनी शाळांना कुलूप ठोकले होते, ही बाब जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गंभीरतेने घेतली नाही त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासकीय बदल्यांचे सत्र सुुरू केलेले आहे.महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र, जलद शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र, डिजीटल शाळांचा ध्यास व सर्व शाळत्त अ श्रेणीत आणण्याचा अठ्ठाहास सुरू केलेला आहे. शैक्षणिक प्रगती करून जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी टिकवायचे असतील तर शाळांना गरजेनुसार शिक्षक व त्यांचेवर अंकुश ठेवणारी पर्यवेक्षीय यंत्रणा पुरेशा प्रमाणात दिली पाहिजे. अपुरे शिक्षक असल्यास कागदोपत्री विद्यार्थी प्रगत दिसतील मात्र वास्तविकता भयाण असेल याचा विचार शिक्षण विभागाने केला पाहिजे.