शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

ईटान-कोलारी पुलाचे स्वप्न होणार साकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:46 IST

भंडारा व चंद्रपुर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या वैनगंगेवरील ईटान-कोल्हारी पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय रस्ते निधीतून १३७ कोटी ३७ लाख रुपयांच्या निधीला १९ जुलै १८ ला प्रशासकीय मंजूरी मिळाली असून या पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय मान्यता : सेतू निर्माण कृती समितीच्या लढ्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु) : भंडारा व चंद्रपुर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या वैनगंगेवरील ईटान-कोल्हारी पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय रस्ते निधीतून १३७ कोटी ३७ लाख रुपयांच्या निधीला १९ जुलै १८ ला प्रशासकीय मंजूरी मिळाली असून या पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पुलाचे स्वप्न साकार होत असल्याने या परिसरातील जनतेत आनंदाचे वातावरण पसरले आहे.‘देश हमे देता है सबकुछ, हम भी तो कछ देना सीखे’ या समर्पित भावनेने सदर पुलाची गरज लक्षात घेवून ईटान कोलारी सेतु निर्माण कृति समितीचे संपर्क प्रमुख उध्दव कोरे यांनी या पुलाची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर घेवून हे आव्हान स्विाकरले. त्यांनी कृती समितीमार्फत शासन, प्रशासन आणि भाजप संघटनेकडे दमदार पाठपुरावा केला. परिणामी या पुलाला प्रशासकीय मान्यता मिळाली.सुमारे ४० वर्षापुर्वी किटाडी-विरली (बु) या जिल्हामार्गाचे बांधकाम करण्यात आले. त्याचवेळी भंडारा व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणाºया ईटान-कोलारी पुल बांधकामासाठी सर्वेक्षण झाले होते. कालांतराने हा प्रस्ताव मागे पडला. याच संधीचा गैरफायदा घेवून जिल्ह्यातील एका वजनदार लोकप्रतिनिधींनी हा पूल अन्यत्र हलविण्याचा डाव आखला. याविषयी परिसरात कुणकुण लागताच नि:स्वार्थ समाजसेवेचे व्रत घेतलेल्या उध्दव कोरे यांनी याविरुध्द लढण्यासाठी कंबर कसली.सर्वप्रथम त्यांनी राजेश महावाडे या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय मान्यवरांच्या भेटी घेवून त्यांना हा पुल ईटान -कोलारी दरम्यानच होणे कसे सर्वांच्या सोयीचे आहे, हे पटवून दिले. या सर्व मान्यवरांची बैठक घेवून हा पुल अन्यत्र हलविण्याचा डाव उधळून लावण्यासाठी ईटान - कोलारी सेतु निर्माण कृती समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून सदर पुलासाठी पाठपुरावा करुन पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लढा देण्याची ठरविण्यात आले. या समितीमध्ये अध्यक्ष वामन बेदरे, निमंत्रक अनिल मेंढे, संयोजक राजेंद्र फुलबांधे, संपर्क प्रमुख उध्दव कोरे, तर सदस्य म्हणून कृष्णाजी शहारे, प्रदिप बुराडे, संजय गजपुरे, वामन तलमले, चंदाबाई राऊत, दयावंती शिलार, अशोक प्रधान, डॉ. वासुदेव विधाते, मेघेश्याम वैद्य, शंकर हुमने, विश्वपाल हजारे, अशोक पारधी, गजानन ठाकरे आणि हरिशचंद्र भाजीपाले यांचा समावेश आहे.या समितीचे संपर्क प्रमुख उध्दव कोरे यांनी परिश्रम करुन ईटान-कोलारी आणि अन्य ठिकाणची भौगोलिक परिस्थिती व इतर बारकाव्याचा अभ्यास करुन ईटान-कोलारी येथेच पूल उभारणे कसे सोयीचे आहे ? हे अनेक लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना पटवून दिले. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, तत्कालनी खा. नाना पटोले, खा. अशोक नेते, आ. डॉ. परिणय फुके, आ. बाळा काशिवार, आ. बंटी भागडीया आणि अनेक मंत्र्यांशी वारंवार पत्रव्यवहार करुन व भेटी घेवून पाठपुरावा केला.लुप्त झालेल्या कार्यकर्ता संस्कृतीसाठी प्रेरणावाटसध्या विविध पक्षांमध्ये कार्यकर्ता संस्कृती लुप्त होत चालली असून कंत्राटदार संस्कृती उदयास येत आहे. अशा परिस्थितीत उध्दव कोरे यांच्यासारखा कार्यकर्त्याने नेटाने लढा देवून या परिसरातील जनतेसाठी वरदान ठरणाºया पुलाचा प्रश्न समितीच्या माध्यमातून मार्गी लावला. हे विविध पक्षातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.