शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

जिल्ह्यात १४ लाख नागरिकांचे डोअर-टू-डोअर सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 5:00 AM

कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या घनिष्ठ व्यक्तींना बाधा होण्याची दाट शक्यता असते. नागरिक आपल्याला इतर लोक वाडीत टाकतील म्हणून खरी माहिती सांगत नाही. ही माहिती प्रशासनाला मिळावी म्हणून दररोज सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाने सुरु केली आहे.

ठळक मुद्देकोरोना जनजागृती : १२९० अंगणवाडी सेविका, ११९० आशा करताहेत सर्वेक्षण

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोव्हीड-१९ रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असून जिल्ह्यातील १४ लाख नागरिकांचे दररोज डोअर-टू-डोअर सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहे. या सर्वेक्षणाला गाव पातळीवर सुरुवात झाली असून १२९० अंगणवाडी सेविका आणि ११९० आशा स्वयंसेविका दारोदारी जाऊन सेवा देत आहेत. कोरोनाचे उच्चाटन होईपर्यंत दररोज सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांना आरोग्य विभागाने दिले आहेत.कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या घनिष्ठ व्यक्तींना बाधा होण्याची दाट शक्यता असते. नागरिक आपल्याला इतर लोक वाडीत टाकतील म्हणून खरी माहिती सांगत नाही. ही माहिती प्रशासनाला मिळावी म्हणून दररोज सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाने सुरु केली आहे.छोट्या गावांमध्ये अंगणवाडी सेविका आणि आशा यांच्या मदतीने हा सर्वे केला जात आहे. तर मोठ्या गावामध्ये आरोग्य सेवक व आरोग्य सेविका मदतीला आहे. हा सर्वे पुर्ण करताना सर्दी, खोकला, ताप याची स्वतंत्र कॅटेगरी करण्याचे आदेश आहेत. तर कोरडा खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या व्यक्तीचा स्वतंत्र वर्ग तयार करण्यात आला. या व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तत्काळ तालुक्याला रेफर करण्याच्या सूचना आहेत. हे सर्वेक्षण पार पाडणाºया व्यक्तीची आरोग्य विभाग विशेष काळजी घेत आहेत. त्यांना मास्क, सॅनिटायझर पुरवित असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. गोळा झालेली माहिती दररोज अपडेट करुन आॅनलाईन पाठविण्याच्या सूचना आहेत. यामुळे गावात कुठला नविन रुग्ण आढळल्यास तत्काळ माहिती मिळणार आहे.ग्रामसेवकही सरसावलेगावातील प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवकाची गणना केली जाते. भंडारा जिल्ह्यातील ग्रामसेवक दररोज गावाला भेटी देवून परगावाहून गावात दाखल झालेल्या व्यक्तींची माहिती गोळा करुन प्रशासनाला पाठवित आहेत. यासाठी दररोज ग्रामपंचायतमध्ये सोशल डिस्टंन्स् ठेवून सभा घेतली जात आहे. यासभेमध्ये तलाठी, सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा आदींचा समावेश असतो. सभा आटोपल्यानंतर गृहभेटी दिल्या जात असून त्यांना कोरोना विषयी माहिती दिली जात आहे.फेब्रुवारी महिन्यापासून अंगणवाडी सेविकांचे मानधन झालेले नाही. मात्र देशावर आलेले संकट लक्षात घेता अंगणवाडी सेविका आरोग्य विभागाच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत आहेत. सर्वेक्षण करताना त्यांना कोरोनाची लागन होवू नये यासाठी मात्र त्यांना साहित्यांचा पूरवठा करावा.-दिलीप उटाणे, हिवराज उके, पदाधिकारी, आयटक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस