शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी मतदानापासून राहिले वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 11:45 IST

अनेकांनी नमुना १२ फॉर्म भरलेच नाहीत : २१७ रुग्णही राहिले उपेक्षित

युवराज गोमासे लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरातील सामान्य रुग्णालयातील २१७ रुग्णांसह शेकडो डॉक्टर व कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले. कानाकोपऱ्यातून राज्याच्या रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्यांनी पोस्टल मतदानासाठी नमुना १२ भरलेच नव्हते, ही बाबही प्रकर्षाने समोर आली. तसेच रुग्णालयात मतदान केंद्राचा अभाव होता. मतदानाचा टक्का घटण्यामागचे हेही एक कारण असल्याचे पुढे आले आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात भंडारा जिल्ह्यासह नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, नाशिक, बुलढाणा, अहमदनगर, संभाजीनगर आदी शहरांसह अन्य शहरातील डॉक्टर व कर्मचारी सेवारत आहेत. मतदानाच्या दिवशी २० नोव्हेंबरला जिल्हा रुग्णालयात २८६ रुग्ण भरती होते. त्यापैकी २१७ रुग्ण १८ वर्षांपेक्षा अधिक वयाचे होते. यामध्ये महिला व पुरुष रुग्णांचा समावेश होता. प्रशासनाच्या वतीने मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जनजागृती करण्यात आली. मतदान केंद्रांची संख्या निर्धारित करण्यात आली.

दिव्यांगांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात आले. परंतु, जिल्हा सामान्य रुग्णालयात मतदान केंद्र निर्माण करण्याचे किंवा त्यांचे मतदान नोंदविण्याचे सौजन्य दाखविण्यात आले नाही, अशी खंत रुग्णांच्या नातेवाइकांकडून व्यक्त करण्यात आली. निदान रुग्णांचे मतदान घेण्यासाठी दिव्यांगांप्रमाणे सुविधा दिली असती तर मतदानाचा टक्का निश्चितच वाढण्यास मदत झाली असती, असे रुग्ण नातेवाइकांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयातील सेवारत शेकडो डॉक्टरांनी व कर्मचाऱ्यांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे चित्रही पहावयास मिळाले. अनेकांनी पोस्टल मतदानासाठी नमुना १२ फॉर्म भरलेच नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

अन्य विभागाचे कर्मचारीही राहिले वंचितजिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण, डॉक्टर व कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले नाही, तर जिल्हा शल्यचिकित्सकांनीही मतदान केले नसल्याचे उघड झाले आहे. तसेच शासकीय कार्यालयातील कर्मचारी तसेच मतदान कार्यात नियुक्त कर्मचारी व अधिकारीही मतदानापासून वंचित राहिले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४bhandara-acभंडाराVotingमतदान