शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

चोरी गेलेल्या घरकुलाचा छडा लागणार काय?

By admin | Updated: November 2, 2014 22:29 IST

लाखांदूर सन २००३-०४ मध्ये इंदिरा आवास योजनेच्या व्याजाच्या रकमेतून तालुक्यात मंजूर झालेले १२ घरकुल प्रस्तावित लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याचे दाखविण्यात आले.

लाखांदूर : लाखांदूर सन २००३-०४ मध्ये इंदिरा आवास योजनेच्या व्याजाच्या रकमेतून तालुक्यात मंजूर झालेले १२ घरकुल प्रस्तावित लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याचे दाखविण्यात आले. मात्र एकालाही काम देण्यात आला नव्हता. गेल्यावर्षी कुडेगाव येथील एका लाभार्थ्याच्या झोपडीत भेट देवून त्या चोरी गेलेल्या घरकुलाचा छडा लावण्याचे आश्वासन देणारे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्याय देतील का? म्हणून लाभार्थ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.तालुक्यातील लाखांदूर, पिंपळगाव को. सरांडी बु. व भागडी येथील जिल्हा परिषद क्षेत्रातून १२ नावे घरकुलासाठी तर ६ नावे घर दुरुस्तीसाठी प्रस्तावित करण्यात आली होती. सदर प्रस्ताव भंडारा जि.प. च्या प्रकल्प संचालकांकडे मंजुरीसाठी सन २००३-०४ ला पाठविण्यात आला होता. या प्रस्तावानुसार प्रस्तावित लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. मात्र यापैकी एकालाही लाभ देण्यात आला नाही. मात्र चौकशी केली असता संबंधित लाभार्थ्यांचे दस्तऐवज पंचायत समिती कार्यालयातून गहाळ झाल्याचे चौकशीअंती उघड झाले होते. पं. समितीच्या शाखा अभियंत्यांनीच तशी कबुलीही दिली होती. अशा प्रकारे विहिर चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. मागील वर्षी लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नुकसान भागाची पाहणी करण्याकरिता भाजपाचे तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष, विनोद तावडे तेव्हाचे आमदार नाना पटोले, राजकुमार बडोले, अ‍ॅड.वसंता एंचिलवार यांनी संपूर्ण चौरास भागाची पाहणी केली. या दरम्यान कुडेगाव येथील पिसाराम नारायण बावनकुडे यांचे घरकुल चोरीला गेले म्हणून माहिती जाणून घेण्यासाठी सर्वांनी पिसारामच्या झोपडीला भेट दिली. यावेळी पिसारामने घरकुल चोरीला गेल्याची व्यथा त्यांचे समक्ष मांडली. यावेळी विधीमंडळात हा प्रश्न उपस्थित करून न्याय मिळवून देण्याची हमी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विरोधात आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरून गरीबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याने त्यावेळी आश्वासन त्यांन दिले होते.मात्र तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष व आजचे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्याने कुडेगाव येथील पिसाराम बावनकुळे यांच्या आशा पल्लवीत झाल्या. देवेंद्र फडणवीस जरी एका खेड्यातील गरीबाचा प्रश्न सहजपणे विसरले असतील. मात्र त्याच्या झोपडीला फडणवीसांनी भेट आज त्यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी यशाची पायरी बनली म्हणून पिसाराम मनातून आनंदात आहे. आपले गाऱ्हाणे थेट ऐवून घेणारा माणूस आज मुख्यमंत्री झाल्याने आज ना उद्या घरकुल मिळणार म्हणून जाम खुश आहे. (तालुका प्रतिनिधी)