शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चालविताना नियमाचे उल्लंघन करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 05:00 IST

भंडारा जिल्हा पोलीसतर्फे जिल्हाभरात ३२ वे महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान, सडक सुरक्षा-जीवन रक्षा अभियान सुरू आहे त्या निमित्ताने अडयाळ पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. अडयाळ येथील अडयाळ विद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानमधील एकूण दहा सोनेरी नियमांचे पत्रक वाटप करण्यात आले. या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ठळक मुद्देसुशांत पाटील : अडयाळ विद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क अडयाळ : दुचाकी  वाहन चालविताना हेल्मेट व चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर अवश्य करावा, वेग मर्यादेपेक्षा अतिवेगात व मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, वाहन चालवताना लेन कटिंग करू नये, मोबाइल फोनचा वापर करू नये, धोकादायकरीत्या वाहन चालवू नये, तसेच पादचाऱ्यांनी झेब्राक्रॉसिंगच्या ठिकाणाहून रस्ता ओलांडावा व वाहन चालविताना पादचाऱ्यांना प्राधान्य द्यावे, पायी चालताना व वाहन चालविताना नियंत्रण व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुशांत पाटील यांनी केले. भंडारा जिल्हा पोलीसतर्फे जिल्हाभरात ३२ वे महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान, सडक सुरक्षा-जीवन रक्षा अभियान सुरू आहे त्या निमित्ताने अडयाळ पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. अडयाळ येथील अडयाळ विद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानमधील एकूण दहा सोनेरी नियमांचे पत्रक वाटप करण्यात आले. या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पाटील म्हणाले, भविष्यात आपण आणि आपल्यामुळे दुसऱ्याचे प्राणही जाणार नाहीत, तसेच अपंगत्वही येणार नाही, बऱ्याच अपघातात बऱ्याच वाहनचालक तथा पादचारी यांचा अपघात होऊन कधी हात, पाय तर कधी दृष्टीही गमवावी लागते. त्यामुळे वाहतूक नियमांचे नियमित पालन करा व घरातील प्रत्येकाला पालन करायला सांगा, असेही यावेळी विद्यार्थ्यांना आवाहन ठाणेदार सुशांत पाटील यांनी केले. मंचकावर पोलीस निरीक्षक सुशांत पाटील शाळेचे पर्यवेक्षक चरणदास बावणे, प्रशांत संतोषवार, विलास कुंभारे, तसेच जितेंद्र वैद्य  अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

खंबीरपणे उभे विशेषतः विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारच्या माहिती, अडीअडचणीसाठी अडयाळ पोलीस स्टेशनमध्ये बिनधास्तपणे यावे आणि आपली समस्या असेल ती सांगावे. यासाठी २४ तास सदैव पोलीस आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, असेही मत यावेळी पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस