जिल्ह्यात सोमवारी ४६ पाॅझिटिव्ह, ४४ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:37 IST2021-03-09T04:37:51+5:302021-03-09T04:37:51+5:30
सोमवारी ६७४ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यात भंडारा तालुक्यात ३९, मोहाडी, लाखनी प्रत्येकी २, तुमसर, पवनी आणि ...

जिल्ह्यात सोमवारी ४६ पाॅझिटिव्ह, ४४ कोरोनामुक्त
सोमवारी ६७४ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यात भंडारा तालुक्यात ३९, मोहाडी, लाखनी प्रत्येकी २, तुमसर, पवनी आणि साकोली तालुक्यात प्रत्येकी १ असे ४६ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १३ हजार ९७५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी १३ हजार २८५ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३२७ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. मार्च महिन्यात कोरोनाने मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात ३६३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक भंडारा २२३, मोहाडी १०, तुमसर ४७, पवनी २६, लाखनी ४०, साकोली १३ आणि लाखांदूर तालुक्यात ४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना लसीकरण सध्या शासकीय आणि खासगी रुग्णालयात सुरु असून नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.