शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

गरिबांना मोफत अन्नधान्यांचे वाटप करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 6:00 AM

क्षेत्रातील कोणताही गरीब लॉकडाऊनच्या काळात उपाशी राहू नये, बेरोजगारीमुळे जगणे मुश्कील होऊ नये म्हणून दोन्ही उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. यावेळी त्यांनी विविध विषयावर नागरिकांशी मार्मिक चर्चा केली. ग्रामपंचायतंीना भेडसावणाऱ्या समस्या, शेतकरी, दुग्ध उत्पादक व धान खरेदी केंद्रांना येणाऱ्या समस्या नागरिकांकडून समजून घेतल्या.

ठळक मुद्देराजू कारेमोरे : 'लोकमत' ई- पेपर आवृत्तीतून होत असलेल्या जनजागृतीचे कौतुक

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा): संपूर्ण जग भयभीत झालेल्या कोरोनावर उपाययोजनेसाठी आमदार निधीचा उपयोग तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रात करणार आहे. विविध उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना लवकरच लेखी पत्र दिले जाईल. याशिवाय स्वखर्चातून क्षेत्रातील अत्यंत गरीब परिवारांना तांदूळ, गहू, तेल व कडधान्यांचे वाटपाचा उपक्रम राबविण्याची घोषणा आमदार राजू कारेमोरे यांनी पालोरा ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या एका बैठकीत केली.क्षेत्रातील कोणताही गरीब लॉकडाऊनच्या काळात उपाशी राहू नये, बेरोजगारीमुळे जगणे मुश्कील होऊ नये म्हणून दोन्ही उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. यावेळी त्यांनी विविध विषयावर नागरिकांशी मार्मिक चर्चा केली. ग्रामपंचायतंीना भेडसावणाऱ्या समस्या, शेतकरी, दुग्ध उत्पादक व धान खरेदी केंद्रांना येणाऱ्या समस्या नागरिकांकडून समजून घेतल्या. अडचणींवर मंथन करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. पालोरा येथील आठवडी बाजाराला भेट देत व्यावसायिक व ग्राहकांच्या अडचणी समजून घेतल्या. सर्वांनी सामाजिक अंतर ठेवून तसेच पाणी व साबणाने हात घेऊन कोरोनापासून सावध राहण्याचा इशारा दिला. यावेळी लोकमत ई- पेपर आवृत्तीचे वाचन करून 'लोकमत'ने घेतलेल्या लोक जागृतीच्या संकल्पासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.बैठकीला आमदार राजू कारेमोरे, सरपंच महादेव बुरडे, जांभोराचे सरपंच भूपेंद्र पवनकर, ठाणेदार निलेश वाजे, अमरकंठ लांडगे, सुखदेव मुरकुटे, प्रकाश भोयर, धान खरेदी केंद्राचे ग्रेडर रहांगडाले, डॉ. अभय शेंडे, ग्रामपंचायत सदस्य रोशन कडव, भोजराम तिजारे, मनीषा बुरडे, रवींद्र ठवकर, भैया कनोजकर व ग्रामस्थ उपस्थित होते.राजू कारेमोरे म्हणाले, सध्या कोरोनावर कोणताही उपचार नाही. त्यामुळे काळजी घेणे, शासन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. संचार बंदीच्या काळात कोणत्याही सुविधाविणा नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. नागपूर, चंद्रपूर, वर्धा आदी ठिकाणांपासून नागरिक रस्त्याने पायी गावांकडे परत जातांना दिसत आहेत. त्यांनी सावधानता बाळगून सर्वांना मदतीचे आवाहन केले. त्याचबरोबर बाहेरून आलेल्यांनी डॉक्टरांकडून तपासणी करून स्वत: होम क्वारटाईनमध्ये रहावे. कोरोनाचा प्रसार बघता गाफील राहून चालणार नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocialसामाजिक