वधूपक्षाकडून मुलाला नापसंती
By Admin | Updated: April 2, 2015 01:01 IST2015-04-02T01:01:01+5:302015-04-02T01:01:01+5:30
सध्या उन्हाळी हंगाम सुरु असून वर - वधू पित्यांची शोधाशोध सुरु आहे.

वधूपक्षाकडून मुलाला नापसंती
पहेला : सध्या उन्हाळी हंगाम सुरु असून वर - वधू पित्यांची शोधाशोध सुरु आहे. त्यात बहुतांश वधू पक्षाकडून जावई शोधताना निव्वळ नोकरी नको, तर जोडीला थोडी फार शेतजमिनही हवी असा आग्रह धरला जातो. पण शेतकरी मुलाला म्हटले की अनेकजण नाक मुरडतात, अशी विचित्र परिस्थिती सध्या पाहावयास मिळत आहे.
ग्रामीण भागातील वर वधू पित्याची सर्व मदार शेतीवर असते. शेतीचा हंगाम व कामे आटोपल्यावर वर वधूची शोधाशोध सुरु होते. त्यामुळे सध्या सगळीकडे लगीनघाईची धावपळ दिसत आहे. यात उच्चशिक्षितासह दहावी, बारावी, डि.एड., तांत्रिक शिक्षण झालेल्या मुलीचे वडील जावई शोधताना नोकरी व जमीनही असणाऱ्या मुलाला प्रथम पसंती देतात. त्यातही सरकारी नंतर खासगी नोकरीला प्राधान्य दिले जाते. तांत्रिक शिक्षण घेणारी मुलगी ही आपला जोडीदार त्याच शिक्षणाचा नोकरीवाला बघते. डी.एड. शिक्षकही आपल्यासारखी नोकरी करणारी जोडी पाहते. नोकरदार मुलांची संख्या कमी असल्याने दुसऱ्या स्थानावर व्यावसायिक मुलांची निवड केली जाते. (वार्ताहर)