वारपिंडकेपार हद्दीत रेतीची शोधाशोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 05:00 IST2020-03-12T05:00:00+5:302020-03-12T05:00:16+5:30
सिहोरा परिसरातील वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे पात्रात रेतीचा विपुल साठा आहे. या रेतीला मोठी मागणी आहे. या नद्यांचे काठावर माफियांनी साम्राज्य उभारले आहे. बावनथडी नदीचे काठावर असणाºया वारपिंडकेपार गावाचे हद्दीत दर्जेदार विपुल रेतीचा साठा असताना माफियांनी बेधडक उपसा केल्याने गावाचे हद्दीतील नदी पात्रात रेती नाही.

वारपिंडकेपार हद्दीत रेतीची शोधाशोध
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : बावनथडी नदी काठावर असणाऱ्या वारपिंडकेपार गावाच्या हद्दीत माफियांनी रेती चोरून नेल्याने गावकऱ्यांची शोधाशोध सुरू झाली आहे. गावाच्या सीमांकित क्षेत्रात केवळ माती शिल्लक आहे. यामुळे शासन माती लिलावात काढणार काय, असा सवाल गावकरी करीत आहेत.
सिहोरा परिसरातील वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे पात्रात रेतीचा विपुल साठा आहे. या रेतीला मोठी मागणी आहे. या नद्यांचे काठावर माफियांनी साम्राज्य उभारले आहे. बावनथडी नदीचे काठावर असणाºया वारपिंडकेपार गावाचे हद्दीत दर्जेदार विपुल रेतीचा साठा असताना माफियांनी बेधडक उपसा केल्याने गावाचे हद्दीतील नदी पात्रात रेती नाही. या गावाचे सिमांकीत मातीचे ढिग आहेत. या गावाचे दुसºया टोकावर मध्यप्रदेशातील गावे आहेत. या राज्याचे सिमांकीत क्षेत्रात रेती उपसा करण्याकरिता गावकऱ्याना जाता येत नाहीत. गावात घरकुल, इमारत, शौचालय व अन्य बांधकाम करण्यासाठी रेतीची गरज असताना गावकऱ्याना नजिकच्या सोंड्या गावाचे हद्दीत सिमांकन क्षेत्रात जावे लागत आहे. शासन घाटांचे लिलाव करित असताना सिमांकन क्षेत्र घोषित करीत आहे. परंतु रेती माफिया घोषित क्षेत्राबाहेर रेतीचा उपसा करीत असल्याने गावकऱ्याना रेतीची टंचाई जाणवत आहे. माफिया सिमांकीत क्षेत्राबाहेर रेतीचा उपसा करित असल्याने दिसून आल्यानंतर कारवाई करण्यात येत नाही. या गावातील घाटांचे लिलाव सध्या झाले नाही. गावाचे हद्दीत असणाºया थोड्या फार रेतीचा उपसा माफियांनी सुरू केला आहे. मध्यप्रदेश राज्याचे सिमांकीत क्षेत्रातील रेतीचा उपसा माफिया करित आहेत. रेतीची चोरी व माफियावर अंकुश घालण्याचे विरोध अधिकार पोलिसांना देण्यात आल्यानंतर महसूल विभागाचे यंत्रणेने फिरकने बंद केल्याचे दिसून येत आहे. पोलिसांना विशेष अधिकार दिल्यानंतर ही रेती माफियावर अंकुश घालण्यात अपयश आले आहे. या अतिरिक्त जबाबदारीमुळे पोलिसांवर कामाचा वाढता व्याप आहे. अनेक तक्रारीचा तपास प्रभावित ठरत आहे. पोलिसाचे रिक्त जागा असल्याने माफियांना रानमोकळे ठरत आहे. सिहोरा परिसरात रेती माफियांना पोलीस आणि महसूल विभागाचा धाक नाही. नद्यांचे काठावरील गावात रेतीचे डम्पिंग दिसून येतील. पडद्यामागून कार्यकारण होत असल्याने रेतीचे माफिया खुलेआम नदीपात्रातून उपसा करित आहेत.
वारपिंडकेपार गावात नदीचे पात्र असताना रेतीचे संकट माफियांनी निर्माण केले आहे. अन्य गावात भयावह स्थिती निर्माण होणार आहे. येत्या काही वर्षात नदीचे पात्रात रेती दिसणार नाही. काठावरील गावातील नागरिक अन्य गावातून रेतीची आयात करणार आहे. पोलीस, महसूल विभागाचे निष्काळजीपणामुळे गावकºयांना रेतीसाठी भटकंती करावी लागणार आहे. यामुळे आता गावातील घाटांचे लिलावात गावकरी विरोध करणार आहेत. सिमांकीत क्षेत्रात रेतीचा उपसा करण्यात येत नाही. माफिया सोबत यंत्रणेतील कर्मचाºयांचे साटेलोटे राहत असल्याने रेतीचा उपसा करण्यात येत आहे. यामुळे गावकरी संतप्त आहेत.
बावनथडी नदीचे पात्रात रेतीची चोरी करण्यात येत असल्याने गावकऱ्याना रेतीची टंचाई जाणवणार आहे. प्रशासनाचे विरोधात गावात रोष आहे.
-जितू पटले, सदस्य, ग्रामपंचायत वारपिंडकेपार.