शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

धडक सिंचन विहिरी, मामा तलावांची कामे प्राथमिकतेच्या आधारावर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 14:53 IST

Bhandara News शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी शासन गंभीरतेने कार्य करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.

 लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : धडक सिंचन विहिरीचे रखडलेले अनुदान त्वरित देण्यात येईल, मामा तलावांचे खोलीकरण व दुरुस्तीच्या कार्यात निधीची कमतरता पडू देणार नाही. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी शासन गंभीरतेने कार्य करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेवेळी ते बोलत होते.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार राजू कारेमोरे, आमदार चंद्रिकापुरे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार राजेंद्र जैन, दिशा फाउंडेशनच्या अध्यक्ष सरीता फुंडे, मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, धनंजय दलाल, शेतकरी संघटनेचे प्रशांत पवार, जयंत वैरागडे, अंगराज समरीत, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, प्रदीप मासुरकर, शैलेश गजभिये, सुरेश बघेल, फजील खान, राशिद कुरेशी, डॉ.राजेश चंदवानी, डाॅ.अनिल शेंडे, अनिल टेंभरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

सुनील फुंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या सिंचन सोयीसंबंधीचे निवेदन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना देण्यात आले. जिल्ह्यातील धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत १३ हजार सिंचन विहिरींना मंजुरी देण्यात आली. मात्र, मागील एक वर्षापासून विहिरीचे अनुदान रखडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे, तसेच जिल्ह्यातील मामा तलावांची दुरवस्था बघता तलाव खोलीकरण व नहरांची दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावी, अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. याप्रसंगी सुनील फुंडे यांच्याकडून ना.पाटील व व रूपाली चाकणकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील