शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

गावांसोबत शहराचाही विकास महत्त्वाचा

By admin | Updated: October 11, 2014 01:18 IST

ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणे व जनतेची कामे गावातच होण्याच्या अनुषंगाने गावाचा विकास .....

भंडारा : ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणे व जनतेची कामे गावातच होण्याच्या अनुषंगाने गावाचा विकास करणे यासोबतच वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचा प्राधान्याने विकास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.भंडारा शहरातील पोस्ट आॅफीस चौक, गांधी चौक, डॉ. हेडगेवार चौक, सहकारनगर आदी शहरात विविध ठिकाणी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सुविधांअभावी व रोजगारांच्या संधीअभावी गावांमधून शहरामध्ये स्थालांतरण होत आहे. गावांमध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त झाले तर स्थालांतरण थांबेल. नगर पालिका प्रशासन यासाठी प्रयत्न करीत असले तरी राज्य सरकारकडून भरीव निधी मिळाल्याशिवाय शहराचा चेहरामोहरा बदलणे अशक्य आहे. या शहराचा नागरिक या नात्याने मागील पाच वर्षात शहराच्या विकासासाठी निधी खेचून आणण्याचा प्रयत्न केला. ऐतिहासिक वारसा असलेल्या गोसावी समाधींना राष्ट्रीय स्मारक घोषित करुन त्यासाठी पुरातत्व विभागाकडून निधी खेचून आणला. शहराची शान असलेल्या भंडारा शहरातील पांडे महलाची विक्री करुन तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचे षड्यंत्र हाणून पाडले. बेला ते सिर्सी हा बयापास मंजूर करवून घेतला आहे. भंडारा व पवनी शहराचा चेहरा मोहरा बदलून एक आदर्श करण्यासाठी संपूर्ण आराखडा तयार करण्यात आल्याचेही भोंडेकर यांनी सांगितले. भंडारा शहरात दौरा करण्यापूर्वी त्यांनी खमारी, आमगांव, कोका, जवाहरनगर आदी गावांचा दौरा केला. या दौऱ्यात तालुकाप्रमुख हेंमत बांडेबुचे, युवासेना संघटक बबलू आतीलकर, विद्यार्थी सेनाप्रमुख मुकेश थोटे, मंगला कोल्हे, अनिल गायधने, आशा गायधने, डॉ. अश्विनी भोंडेकर आदी पदाधिकारी होते. (प्रतिनिधी)