शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सोमलवाडा येथे अतिक्रमण निर्मूलनात उदासीनता

By admin | Updated: February 12, 2015 00:39 IST

सोमलवाडा रस्त्यावरील बाजार ओळीमधील अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायतीने नोटीस बजावले आहे.

लाखनी : सोमलवाडा रस्त्यावरील बाजार ओळीमधील अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायतीने नोटीस बजावले आहे. अतिक्रमणाच्या विळख्यातून लाखनीवासीयांना स्थानीक सरपंच बाहेर काढणार की केवळ नोटीसचे लॉलिपाप दाखवून मुग गिळून गप्प बसणार याकडे ग्रामवासीयांचे लक्ष लागले आहे.राष्ट्रीय महामार्गालगत बाजारामधून सोमलवाडा रस्ता आहे. या रस्त्यावर अनेक वर्षापासून अतिक्रमण आहे. त्यामुळे वाहतुक व रहदारासाठी अडचण निर्माण होत असते. सोमलवाडा, रेंगेपार (कोठा), गोंडसावरी, सावरी, दैतमांगली, खेटेपार, चंद्रपूर (कोका), करडी आदी अनेक गावांना लाखनीसोबत जोडणारा मार्ग असून या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सुरू असलेली बससेवा मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. अतिक्रमण धारकांना ग्रामपंचायतीद्वारे तीनवेळा नोटीस बजाविण्यात आली आहे.ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना 'मॅनेज' करून अतिक्रमणाच्या जागेवर इमारती उभ्या केल्या आहेत. जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाने या रस्त्याच्या मध्यभागातून २० फूट अंतरावर सिमेंट नालीचे बांधकामास मंजुरी दिली आहे. रस्त्यावरील व्यावसायिक रस्त्याच्या मध्य भागापासून २० फूट जागा प्रशासनाला अतिक्रमणातून मोकळी करून देण्यास तयार आहेत. २६ जानेवारी २०१५ च्या ग्रामसभेत सर्वानुमते अतिक्रमण हटविण्याच्या संदर्भात ठराव घेण्यात आला आहे, असे असतानाही ग्रामपंचायतचे पदाधिकारी अतिक्रमण हटविण्याबाबतची ठोस भूमिका घेतानी दिसत नाही. यामुळे ग्रामपंचायतचे पदाधिकारी 'मॅनेज' झाल्याची चर्चा आहे. रस्त्यावर अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. पार्किंगची व्यवस्था नाही. रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यास व्यापाऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)