शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रध्देचे भूत मानगुटीवर, गोरबडे कुटुंबाची वाताहत

By admin | Updated: October 14, 2014 23:14 IST

जादुटोणाविरोधी कायदा असतानाही तुमसर तालुक्यातील मिटेवानी येथील एका कुटूंबावर गाव सोडून जाण्याचा प्रसंग ओढवला आहे. 'ते' कुटूंब सध्या भयभीत झाले असून नातेवाईकांच्या घरी आश्रयाला गेले आहेत.

तुमसर : जादुटोणाविरोधी कायदा असतानाही तुमसर तालुक्यातील मिटेवानी येथील एका कुटूंबावर गाव सोडून जाण्याचा प्रसंग ओढवला आहे. 'ते' कुटूंब सध्या भयभीत झाले असून नातेवाईकांच्या घरी आश्रयाला गेले आहेत. याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे.तुमसर तालुका मुख्यालयापासनू पाच किमी अंतरावरील मिटेवानी येथील संजय गोरबडे यांच्या कुटूंबावर हा प्रसंग ओढवला आहे. जेमतेम तीन हजार लोकसंख्येच्या गावात संजय गोरबडे हे कुटूंबासह शेती व मजुरी करून उदरनिर्वाह भागवितात. त्यांच्या घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या एका कुटूंबातील युवती आजारी आहे. आजारपणात ती संजय गोरबडे यांच्या नावाने बडबडत असते. त्यामुळे संजयनेच मुलीवर जादुटोणा केल्याचा आरोप युवतीच्या कुटूंबीयांनी करून वाद घातला. अंधश्रध्देने पछाडलेल्या 'त्या' कुटूंबातील व्यक्तींना गावातील नागरिक व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर गोरबडे यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या मानगुटीवर अंधश्रध्देचे भूत बसून असल्याने त्यांनी संजयवरच आक्षेप घेतला. काहींनी युवतीच्या वडिलांना समजावून तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्याचे सुचविले. युवतीला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले, मात्र उपचार अर्ध्यावर सोडून युवतीला परत गावाला घेऊन गेले. पुन्हा त्या युवतीने बडबडून संजय यांचे नाव घेणे सुरू केले. त्यामुळे संजय गोरबडे यांच्या कुटूंबीयांप्रती असंतोष पसरला. यामुळे संजयने कुटूंबासह गाव सोडले. अंधश्रध्देमुळे राहते घर सोडून जावे लागल्याने संजयला हसारा येथील नातेवाईकाकडे आश्रय घ्यावा लागला आहे. सदर आशयाचे वृत लोकमतमध्ये आज मंगळवारला प्रकाशित झाले. त्यात अनावधानाने संजय गोरबडे यांच्याऐवजी शंकर गोरबडे यांचे नाव प्रकाशित झाले होते. राज्य शासनाने अंधश्रध्दा निर्मूलनाचा कायदा कठोर करून दंडाची शिक्षेची तरतुद केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे निर्देश राज्य शासनाने प्रशासनाला दिले आहे. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीने प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)