शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
3
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
4
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
5
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
6
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
7
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
8
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
9
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
10
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
11
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
12
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
13
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
14
महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी
15
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
16
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
17
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
18
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
19
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
20
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या मागणीसाठी कुलूपबंद आंदोलन स्थगित

By admin | Updated: July 9, 2016 00:39 IST

शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे.

धानोरी शाळेतील प्रकार : जि.प. उपाध्यक्षांचे आश्वासनपवनी : शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. धानोरी येथील शाळेत शिक्षकाच्या मागणीसाठी आज शुक्रवारला शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. दरम्यान जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलनाला तुर्तास स्थगीती दिली.जिल्हा व तालुकास्तरार शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या. यात अनियमितता झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शाळांवर शिक्षकांची कमतरता दिसून येत आहे. तालुक्यातील धानोरी, कन्हाळगाव व चांदी (चन्नेवाडा) येथील इयत्ता पहिली ते ७ वी पर्यंतच्या वर्गांना केवळ दोन शिक्षक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. धानोरी येथील उच्च प्राथमिक शाळेला पुरेशी पटसंख्या आहे. तरी देखील तालुकास्तरावरील बदलीने दोन पदवीधर व एका प्राथमिक शिक्षकाची बदली करण्यात यावी, त्यामुळे वर्ग ७ व शिक्षक मात्र एक अशी शाळेची अवस्था झाली आहे. कन्हाळगाव येथून एका शिक्षकाची प्रशासकीय बदली करून धानोरी येथे नियुक्ती केल्याने सात वर्गासाठी दोन शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी येथे शिक्षकांची रिक्त पदे भरावी, अशी मागणी पालकांनी केली. मात्र त्यांच्या मागणीकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी करून आज शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा यापूर्वी निवेदनातून दिलेला होता. एका पदविधर शिक्षकाची गरज असतानाही शिक्षण विभागाने त्यांची मागणी धुळखावून लावली आहे. दरम्यान गावकऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांच्याशी संपर्क साधला. यावर डोंगरे यांनी शाळेला लवकरच शिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी कुलूपबंद ठोकण्याचा निर्णय तुर्तास मागे घेतला. यावेळी ईश्वर तिघरे, नरेश जुमळे, संदीप आवळे, देवकन्या बारसागडे, जासुंदा मंडपे, वनिता दिघोरे, शारदा वावधरे, विश्रांती घुटके, मारोती सतीबावने, रायभान तिघरे, नामदेव वाघधरे, व्यंकट मंडपे, लता शिंदे, भागवत नागपुरे, विजय खरकाळे, रायभान तिघरे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)