शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना किचन सेटचे वितरण अडकले; नोंदणी व नूतनीकरणही थांबले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 14:26 IST

आचारसंहितेचा फटका : निवडणूक आटोपण्याची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत कामगार म्हणून नोंदणी करणाऱ्या कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. जिल्ह्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी नोंदणी व नूतनीकरणाचे काम सुरू होते. तसेच कामगार किटचे वितरणही सुरू होते. परंतु आचारसंहिता सुरू झाल्यानंतर नोंदणीची प्रक्रिया थांबविण्यात आली. त्यामुळे कामगारांना नवीन सरकार सत्तारूढ होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत वर्षभर नोंदणी व नूतनीकरणाची मोहीम सुरू असते. सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने नवीन नोंदणी व नूतनीकरण तसेच लाभ वितरणाचीही प्रक्रिया थांबवलेली आहे. इमारत व इतर बांधकाम क्षेत्राशी संबंधित कामगारांनी नोंदणी केल्यास त्यांना संरक्षक किटसह विविध साहित्याचा लाभ दिला जातो. हा लाभ मिळावा यासाठी कामगार नोंदणी करतात. परंतु, सध्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे. 

महिनाभर करावी लागणार प्रतीक्षा जिल्ह्यात आचारसंहिता लागू होईपर्यंत सक्रिय कामगारांना किचन संच वितरणाचे काम हाती घेण्यात आले होते. काही कामगारांना किट संचचे वितरण करण्यात आले. बहुतांश मजूर अद्यापही किचन संच लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. हे किचन संच केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा मजुरांना आहे. किचन संचामध्ये विविध प्रकारच्या साहित्यांचा समावेश आहे. आता निवडणूक संपेपर्यंत म्हणजे साधारणतः महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

३० हजारांवर सक्रिय कामगार जिल्ह्यात ३० हजारांवर सक्रिय कामगार आहेत. हे कामगार दरवर्षी नूतनीकरण करतात. कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभसुद्धा दिला जातो.

कामगारांना असे मिळतात लाभसामाजिक सुरक्षापहिल्या विवाहाच्या प्रतिपूर्तीसाठी ३० हजार रुपये, मध्यान्ह भोजन योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण आदी आदी सामाजिक सुरक्षेच्या योजना राबविल्या जातात. सदर योजनांचा लाभ पात्र कामगारांना दिला जातो. 

शैक्षणिक सुविधाइयत्ता पहिली ते सातच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष दोन हजार ५००, तर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष ५ हजार रुपये. इयत्ता दहावी व बारावीमध्ये किमान ५० टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास १० हजार रुपये. वैद्यकीय पदवी- करिता प्रतिवर्षी १ लाख रुपये. अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्षी ६० हजार रुपये. 

आरोग्यविषयकनैसर्गिक प्रसूतीसाठी १५ हजार रुपये, शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी २० हजार रुपये, गंभीर आजाराच्या उपचारार्थ १ लाख रुपये, एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंबनियो जनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत १ लाख रुपये मुदत ठेव. ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये. तसेच आरोग्य योजनेचा लाभ मिळतो.

टॅग्स :Labourकामगारbhandara-acभंडाराCode of conductआचारसंहिताmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४