अपघातात तरुण प्राध्यापकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:04 PM2019-05-27T23:04:13+5:302019-05-27T23:04:28+5:30

तुमसर - वाराशिवनी आंतरराज्यीय मार्गावर हरदोली शिवारातील वळण मार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरुण अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राध्यापक जागीच ठार झाले. सदर अपघात रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडला. मृत प्राध्यापकाचे नाव कार्तीक शांताराम आगाशे (२५) रा. कर्कापूर असे आहे.

Death of a young professor in an accident | अपघातात तरुण प्राध्यापकाचा मृत्यू

अपघातात तरुण प्राध्यापकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देहरदोली शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर - वाराशिवनी आंतरराज्यीय मार्गावर हरदोली शिवारातील वळण मार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरुण अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राध्यापक जागीच ठार झाले. सदर अपघात रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडला. मृत प्राध्यापकाचे नाव कार्तीक शांताराम आगाशे (२५) रा. कर्कापूर असे आहे.
कार्तिक आगाशे रविवारी रात्री ११ च्या सुमारास दुचाकीने तुमसरवरुन कर्कापूरला जात होते. हरदोली शिवारात वळण मार्गावर एका अज्ञात वाहनाने कार्तिक यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात ते दूर फेकल्या गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. डोक्याचा अक्षरक्ष चेंदामेंदा झाला. यात कार्तिक यांचा जागीच मृत्यू झाला. हरदोली शिवारात वळण मार्गावर मागील पंधरा दिवसातील हा दुसरा अपघात असून अपघातातील दोन्ही जणांचा मृत्यू झाला आहे. काटकोन त्रिकोणात हा वळणमार्ग आहे. धोकादायक वळणमार्गाला तांत्रिकदृष्ट्या दखल घेऊन संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुर यांनी केली आहे. येथे निष्पाप जणांचा बळी जात आहे. कार्तिक आगाशे तालुक्यातील खैरलांजी येथील अंजनिय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्राध्यापक होते. अभ्यासात अतिशय हुशार व विद्यार्थी प्रीय म्हणून ते ओळखले जात होते. त्यांच्या मृत्यूने कर्कापूर गावावर शोककळा पसरली.

Web Title: Death of a young professor in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.