रानडुकराच्या धडकेत एकाचा मृत्यू

By Admin | Updated: March 8, 2015 00:23 IST2015-03-08T00:23:44+5:302015-03-08T00:23:44+5:30

धुळवडीच्या दिवशी बघेडावरून चिचोलीकडे जाताना दुचाकीला रानडुकराने जबर धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. इतर दोघे गंभीर जखमी झाले.

The death of one of Randukara's death | रानडुकराच्या धडकेत एकाचा मृत्यू

रानडुकराच्या धडकेत एकाचा मृत्यू

तुमसर : धुळवडीच्या दिवशी बघेडावरून चिचोलीकडे जाताना दुचाकीला रानडुकराने जबर धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. इतर दोघे गंभीर जखमी झाले. रानडुकराचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. युवकाच्या मृत्यूमुळे बघेडा येथे शोककळा पसरली. धुळवडीच्या दिवशी एकाही घरी चुली पेटल्या नाही. मृतक तरुणाचे नाव कार्तीक मोतीलाल रहांगडाले (२५) असे आहे.
सांसद आदर्श गाव गर्रा बघेडा येथील कार्तिक रहांगडाले, गुलशन रवींद्र रहांगडाले (२४), सुरेश चौधरी (२५) हे तिघे मित्र बघेडा येथून चिचोलीकडे शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास दुचाकीने निघाले. बघेडा चिचोली दरम्यान वळणावर एका नाल्याजवळ रान डुकराने दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेमुळे दुचाकीसह तिघेही दूर फेकल्या गेले. यात कार्तीक रहांगडाले यांच्या डोक्याला, छातीला जबर मार लागला. गुलशन रहांगडाले व सुरेश चौधरी गंभीर जखमी झाले. धडक मारणारा रानडुकराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमी तिघांनाही तातडीने तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. यात कार्तीक रहांगडाले याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुलशन रहांगडाले व सुरेश चौधरी यांच्यावर उपचार सुरु आहे.
बघेडा येथे अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तुमसर येथील रुग्णालयात ग्रामस्थांची गर्दी झाली होती.
कार्तिक हा आईवडीलांचा एकुलता मुलगा होता. कार्तीक याची राज्य राखीव पोलीस दलात निवड झाली होती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The death of one of Randukara's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.