लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली (भंडारा) : अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील विर्शी फाट्याजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी मृत बिबट्याला ताब्यात घेऊन विर्शी रोपवाटिका येथे नेले.विर्शी फाट्याजवळ एक बिबट मृतावस्थेत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. माहिती मिळताच वनक्षेत्राधिकारी आरती उईके, सहायक वनक्षेत्राधिकारी थोटे, वनरक्षक घुंगे हे ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. मृत बिबट्याचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी वाघाडे यांनी केले. शवविच्छेदनानंतर या बिबट्याला विर्शी रोपवाटिकेत जाळण्यात आले. पुढील तपास सुरु आहे.घटनास्थळाच्या दोन्ही बाजूला नागझिरा व नवेगाव बांध व्याघ्र प्रकल्पाचे घनदाट जंगल आहे. या जंगलात वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. वन्यप्राणी जंगलात भ्रमंती करताना राष्ट्रीय महामार्ग ओलांडून जातात. वाहतूक जास्त प्रमाणात असल्याने बरेचदा वन्यप्राणी अपघातात ठार होतात. यापूर्वीही महामार्ग ओलांडताना याठिकाणी अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत.
साकोलीनजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 13:58 IST
अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील विर्शी फाट्याजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी मृत बिबट्याला ताब्यात घेऊन विर्शी रोपवाटिका येथे नेले.
साकोलीनजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावरील विर्शी फाट्याजवळ घडली घटना