शवविच्छेदनगृह असूनही मृतदेहांची होतेय प्रतारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 22:30 IST2017-12-10T22:30:39+5:302017-12-10T22:30:54+5:30
आरोग्य विभागामार्फत आंधळगाव येथे शवविच्छेदनगृह बांधले. येथे सुविधा नसल्याने एखाद्या घटनेत मृत पावलेल्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी मोहाडी किंवा तुमसरला पाठविण्यात येते.

शवविच्छेदनगृह असूनही मृतदेहांची होतेय प्रतारणा
संजय मते ।
आॅनलाईन लोकमत
आंधळगाव : आरोग्य विभागामार्फत आंधळगाव येथे शवविच्छेदनगृह बांधले. येथे सुविधा नसल्याने एखाद्या घटनेत मृत पावलेल्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी मोहाडी किंवा तुमसरला पाठविण्यात येते. यामुळे मृतदेहांची प्रतारणा होत असल्याचा संतापजनक प्रकार येथे घडत आहे.
मागील बारा वर्षापासून प्रेताच्या प्रतीक्षेत असलेल्या शवविच्छेदन गृहाची मात्र दुर्दशा झालेली आहे. आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावात घडणाºया विविध अपघाताच्या घटनेत मृतदेहांच्या शवविच्छेदनासाठी मोहाडी तर कधी तुमसरला जावे लागत होते. कधी ताटकळत बसावे लागत होते. प्रेताची आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी अडचण लक्षात घेता पोलीस स्टेशन शवविच्छेदनगृह बांधण्यात आले. शवविच्छेदन गृह बांधले तेव्हापासून त्याठिकाणी कोणत्याही सोईसुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. दरवाजे मोडकळीस आलेले आहे. मागील बारा वर्षात या शवविच्छेदन गृहात एकाही प्रेताचे विच्छेदन झालेले नाहीत. आंधळगाव पोलीस स्टेशनअंतर्गत अपघातात दगावलेल्यांना आजही मोहाडी तर कधी तुमसरला न्यावे लागत आहे. येण्याजाण्याच्या आर्थिक खर्चासह शारीरिक व मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.