भंडारा-पवनी मार्गावर जीवघेणे खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 22:09 IST2019-01-20T22:09:02+5:302019-01-20T22:09:47+5:30
निलज ते कारधा टोल नाका एकूण ४३ किलोमीटरच्या रस्ता बांधकामाला हळुवारपणे सुरुवात झाली असली तरी या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. बऱ्याच ठिकाणचे रस्ते चाळणी झाले आहेत. यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. निलज फाटा ते कारधा टोल नाका हा रस्ता नव्या स्वरूपाचा तयार होणार असला तरी वाहनधारक, प्रवासी व वाहनचालकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भंडारा-पवनी मार्गावर जीवघेणे खड्डे
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : निलज ते कारधा टोल नाका एकूण ४३ किलोमीटरच्या रस्ता बांधकामाला हळुवारपणे सुरुवात झाली असली तरी या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. बऱ्याच ठिकाणचे रस्ते चाळणी झाले आहेत. यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. निलज फाटा ते कारधा टोल नाका हा रस्ता नव्या स्वरूपाचा तयार होणार असला तरी वाहनधारक, प्रवासी व वाहनचालकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सिंदपुरी, रुयाळ, पालोरा, कोंढा, अड्याळ, पहेला, दवडीपारी, आंबाडी अशा गावातील महामार्गावर बºयाच ठिकाणी खड्डे तर काही अंतर संपूर्ण खडतर आहे. याआधी या खड्ड्यांमध्ये मुरुम घालुन खड्डे सपाट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु त्यामुळे वाहनचालकांना धुळीचा त्रासही झाला होता. त्यानंतर पहेला येथे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता.
कारधा टोल नाका ते अड्याळ आणि त्यापुढे नवीन रस्ता बनणार आहे. परंतु याच महामार्गावरील मोठमोठे खड्डे जर सपाट झाले तर तेवढाच आधार वाहनचालकांना व प्रवाशांना होऊ शकतो. ज्या ठिकाणी अधिकाधिक खड्डे आहेत ते भरल्या गेले नाही आणि जेव्हा मुरुमाने खड्डे भरल्या गेले होते, तेव्हा तेही जास्त काळ दिवस टिकाव धरु शकले नाही. परिणामत: वाहनचालक आणि धारक तसेच प्रवासी या मार्गाने जाताना मात्र मनात धास्ती करुन जाताना दिसतात.
सध्या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली असली तरी यामुळे थोडा कमी अधिक प्रमाणात त्रास सहन करावा लागू शकतो. परंतु कमीत कमी प्रमाणात त्रास होणार याचीही काळजी संबंधित विभाग तसेच अधिकाºयांची नाही का, असा प्रश्न आहे. दर महिन्याला या महामार्गावर एक ना एक अपघात होताना दिसतो. यात अनेकांचे प्राणही गेले आहेत. वेळोवेळी धूळ होणार नाही, प्रवाशांना तसेच वाहनचालकांनाही याचा त्रास होणार नाही याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी, अशी मागणी सध्या जोमात सुरु आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.