मासळ येथे डेंग्यूसदृश आजाराचा धोका
By Admin | Updated: September 14, 2014 23:54 IST2014-09-14T23:54:37+5:302014-09-14T23:54:37+5:30
जिल्हाभर डेंग्यूसदृश आजार, विषाणूजन्य आजार व इतर किटकजन्य आजार बळावले असतानाच मासळ येथेसुद्धा डेंग्यू ताप पाय पसरतो की काय? अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

मासळ येथे डेंग्यूसदृश आजाराचा धोका
मासळ : जिल्हाभर डेंग्यूसदृश आजार, विषाणूजन्य आजार व इतर किटकजन्य आजार बळावले असतानाच मासळ येथेसुद्धा डेंग्यू ताप पाय पसरतो की काय? अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नुकताच मासळ येथील संकेत डाकराम टेंभूरकर (१५) याला ताप आल्यानंतर भंडारा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी डेंग्यूसदृश ताप असल्याचे सांगून त्याच्यावर उपचार केले. आता तो घरी असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गावात बरेच तापाचे रुग्ण निघत आहे व ते खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. डेंग्यूसदृश ताप गावात पसरू नये यासाठी आरोग्यविभागाने वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. आजाराबाबत योग्य त्या उपाययोजान करून जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. गावात बऱ्याच ठिकाणी स्वच्छतेची उणीव आहे. सार्वजनिक नळाचे सांडपाणी, विहिरींचे सांडपाणी नालीत जमा होते व डासांची उत्पत्ती होते व तिथूनच कीटकजन्य आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी ग्रामपंचायतने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी आहे. (वार्ताहर)