शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

धानावर करपा, तुडतुडाचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 25, 2016 00:52 IST

लाखनी तालुक्याला निसर्गाने चौफेर घेरले आहे. कुठे उन तर कुठे पाऊसाचे सत्र सुरूच आहे. आजही १० टक्के रोवणी झालीच नाही.

शेतकरी संकटात : ढगाळ व उष्ण हवामानाचा फटकापालांदूर : लाखनी तालुक्याला निसर्गाने चौफेर घेरले आहे. कुठे उन तर कुठे पाऊसाचे सत्र सुरूच आहे. आजही १० टक्के रोवणी झालीच नाही. आटोपलेल्या रोवणीला पावसाने ओढ ताण दिल्याने हंगाम अपेक्षित आला नाही. कन्हैया, पोळा, गणपतीमध्ये पाऊस झाल्याने धान जगला व आता काही फुलोरावर तर गर्भात असताना करपा, तडतुडा व अळीचा प्रादूर्भाव झाल्याने पिक संकटात आलेआहे. पिक वाचविण्याकरीता शेतकऱ्यांची पराकाष्टा सुरू झाली आहे.पालांदूर परिसरात चुलबंदच्या खोऱ्यात काठवरील हलके धान कापणीला आले असताना परतीच्या पावसाने व्यत्य आणल्याने हंगाम लांबला आहे. नरव्हा, पाथरी, मऱ्हेगाव, ढिवरखेडा, वाकल आदी गावात १०० ते १२० दिवसाचे धान कापणीयोग्य झालेले आहेत. ढगाळ व उष्ण हवामानामुळे तुळतुळा अळी जोर करीत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. १/२ दिवसाच्या अंतराने हलका ते मध्यम पावसाच्या सरी येत असल्याने कापणी करने अवघड झाले आहे.मागील वर्षाला लाखनी परिसरात अशाच रोगाने धानपिक उध्वस्त करून चिंता वाढवली होते. कृषिविभागाची अख्खी टिम शेतकऱ्यांच्या मदतीकरीता धावली होती. यावर्षी पालांदूर परिसरात करपा तुडतुडा यांनी नाकीनऊ आणले आहे. करपा रोगाचे प्रकार अधिक असल्याने सामान्य शेतकऱ्याचा समजण्या पलीकडे आहेत. गावातील कृषीचे पदवीधर शेतकऱ्यांच्या विनंतीवरून शेतावर भेट देऊन मार्गदर्शन सुरू आहे. धान हे भंडारा जिल्ह्यातील मुख्य पिक व परंपरेने घेत आलेले असले तरी रोग मात्र नवीन नवीन येत असल्याने शेतकऱ्याला समजण्याच्या पलीकडे आहेत.हलक्या व भारी धानाला पावसाची चिंता दूर झालेली आहे. नवरात्रात एखादा पाऊस आल्यास पूर्णत: धानपिक निपटणार यात शंका नाही. मात्र रोगांचे प्रमाण अनियंत्रित असल्याने कृषी विभागाची गरज वाढली आहे. (वार्ताहर)