पवनीतील पर्यटन संकुलाची दैनावस्था
By Admin | Updated: December 11, 2014 23:03 IST2014-12-11T23:03:12+5:302014-12-11T23:03:12+5:30
तालुक्यातील पर्यटनस्थळ व भेटी देणारे पर्यटक यांचा विचार करुन शासनाने निसर्गरम्य बालसमुद्र तलावाचे काठावर पर्यटन संकुल मंजूर केले. पर्यटन संकूलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले. कंत्राटदाराला कामाचे

पवनीतील पर्यटन संकुलाची दैनावस्था
अशोक पारधी - पवनी
तालुक्यातील पर्यटनस्थळ व भेटी देणारे पर्यटक यांचा विचार करुन शासनाने निसर्गरम्य बालसमुद्र तलावाचे काठावर पर्यटन संकुल मंजूर केले. पर्यटन संकूलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले. कंत्राटदाराला कामाचे देयक न मिळाल्यामुळे किरकोळ काम शिल्लक राहून हस्तांतरण तर थांबलेच. पंरतु बांधकाम झालेल्या पर्यटन संकूलाची दैनावस्था सुरु झाली आहे.
प्राचीन व ऐतीहासीक वारसा असलेले पवनी नगर विदर्भाची काशी म्हणून संबोधल्या जाते. व्यापारासाठी भूतकाळात प्रसिध्द असलेल्या नगराचे संरक्षणासाठी मानवनिर्मित इंग्रजी यु आकाराची संरक्षण भिंत व जवाहर गेट पासून काही अंतरापर्यंत भिंतीवर बांधलेली तटबंदी, परकोट(किल्ला), विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले पंचानन गणेश किंवा पंचमुखी गणेश, धरणीधर गणेश मंदिर, वैजेश्वर देवस्थान, मुरलीधर मंदिर, गधादेव, जगन्नाथ मंदिर, दिवाणघाट, वैजेश्वर घाट, पुरातत्व विभागाने उत्खनन करुन शोधलेले भव्य बौध्द स्तुप व त्यांचे अवशेष, दस्त्यांचे स्थान म्हणून प्रसिध्द असलेले चंडीका मंदिर, विढ्ढल रुख्मिणी मंदिर, दत्त मंदिर, राममंदिर, शिल्पकलेचे उत्तम नमुना असलेले गरुड खाब तसेच गोसीखुर्द धरण, कऱ्हांडला पवनी अभयारण्य, रुयाळ येथील महासमाधीभूमी परिसर, कोरंभा डोंगरावरील महादेव मंदिर, ठाणा येथील निसर्गरम्य चंडीकामंदिर व अभयारण्यामुळे प्रवेशास बंदी असलेले ढिवरढुटी असे अनेक पर्यटन स्थळ पवनी तालुक्यात आहे. ही सर्व स्थळे एका दिवसात पाहणे शक्य नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पर्यंटन मंत्रालयाने पवनी येथे ७ वर्षापूर्वी पर्यटन संकूल प्रस्तापित करुन बांधकाम सुरु केले. थाटात भुमिपूजन झाले. अल्पावधीत पूर्ण करण्याचे आश्वासन तत्कालीन मंत्र्यांनी दिले परंतु लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही. अशी म्हण आहे. अगदी तसेच पर्यटन संकूलाचे बाबतीत झाले.
कोटयावधी रुपयांचे हे पर्यटन संकूल बांधून तयार आहे. पर्यटकांना रमवेल असे स्थळ निवडण्यात आले. प्रशस्त हॉल, आकर्षक इमारत तयार आहे. पंरतु शासनाचे दुर्लक्षामुळे कोट्यावधी रुपये खर्च झालेली इमारत धूळखात पडलेली आहे. छतावर स्लॅप ऐवजी टीनपत्रे वापरली असल्याने हवेच्या दाबाने ती उडू लागली आहेत.
पावसाचे पाणी गळून सिटींगचे पीओपी गडून पडत आहे व झालेली रंगरंगोटी खराब होत आहे. पर्यटन विभाग हा सर्व बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने पर्यटकांत नाराजीचा सुर आहे. पर्यटन संकूल पर्यटकांच्या सेवेसाठी लवकरात लवकर सुरु करावे अशी मागणी जोर धरत आहे.