सावरी जुगार अड्ड्यावर गुन्हे अन्वेषण विभागाची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST2021-06-16T04:47:09+5:302021-06-16T04:47:09+5:30

जवाहरनगर : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग भंडाराद्वारे सावरी येथील राहुल नानकचंद अरोरा यांच्या घरी जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त ...

Criminal Investigation Department raids Savri gambling den | सावरी जुगार अड्ड्यावर गुन्हे अन्वेषण विभागाची धाड

सावरी जुगार अड्ड्यावर गुन्हे अन्वेषण विभागाची धाड

जवाहरनगर : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग भंडाराद्वारे सावरी येथील राहुल नानकचंद अरोरा यांच्या घरी जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार सायंकाळी ५.२५ वाजताच्या सुमारास धाड टाकण्यात आली. यात जुगार खेळताना राहुल अरोरा (३४ ), संजीव ठाकूर (५०), अमर वालदे (४५) सर्व रा. सावरी, सुजित कावडे (४८), होमचंद धकाते (४२), राहुल गोमासे (३४), विलास मदनकर (३६), सर्व रा जी. टाईप जवाहरनगर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यांच्याकडून रोख रक्कम व साहित्य यात मोबाईल, दुचाकी वाहन इत्यादी असे एकंदरीत एक लक्ष ४९ हजार ७००रुपयांचे साहित्य पोलिसांनी घटनास्थळाहून हस्तगत केले. जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, पोलीस हवालदार बोरकर,पोलीस नायक देशमुख ,मेश्राम ,करंजेकर, पोलीस शिपाई भानारकर, कापगते, रामटेके यांचा समावेश होता.

Web Title: Criminal Investigation Department raids Savri gambling den