Coronavirus in Bhandara; भंडारा जिल्ह्यात १२०५ कोरोनामुक्त, ७३१ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 19:44 IST2021-05-07T19:44:02+5:302021-05-07T19:44:20+5:30
Bhandara news भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून शुक्रवारी ७३१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर १२०५ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. ११ जणांचा मृत्यू झाला असून ७५४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Coronavirus in Bhandara; भंडारा जिल्ह्यात १२०५ कोरोनामुक्त, ७३१ पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून शुक्रवारी ७३१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर १२०५ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. ११ जणांचा मृत्यू झाला असून ७५४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. बाधितांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात गुरूवारी २२२६ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात २०२, मोहाडी १६, तुमसर ३९, पवनी ४९, लाखनी १४३, साकोली २६३, लाखांदूर १९ व्यक्तींचा समावेश आहे. तर ११ जणांचा मृत्यू झाला. त्यात भंडारा आणि पवनी तालुक्यात प्रत्येकी तीन, तुमसर तालुक्यात दाेन तर मोहाडी, लाखनी आणि साकोली तालुक्यात प्रत्येकी एका जणाचा कोरोनाने मृत्यू झाला. गुरूवारी १२०५ व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत ४६ हजार ४६५ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात तीन लाख ५१ हजार ७९८ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५४ हजार ९६३ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले. तर ९५१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
जिल्ह्यात ७५४७ व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यात भंडारा तालुक्यात २७५८, मोहाडी ३८४, तुमसर ७७०, पवनी ६९०, लाखनी ८६६, साकोली १७६६, लाखांदूर ३०३ व्यक्तींचा समावेश आहे.