भंडारा जिल्ह्यात पावसाची संततधार; बोदरा तलाव फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 10:40 IST2020-08-21T10:39:50+5:302020-08-21T10:40:12+5:30

 गुरुवार दुपारपासून जोरदार पावसाला प्रारंभ झाला. रात्री उशीरापर्यंत पाऊस बरसत होता. शुक्रवारी पहाटे विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सकाळी ९ वाजतापासून सुरवात झाली.

Continuous rains in Bhandara district; Bodra lake burst | भंडारा जिल्ह्यात पावसाची संततधार; बोदरा तलाव फुटला

भंडारा जिल्ह्यात पावसाची संततधार; बोदरा तलाव फुटला

ठळक मुद्दे सखल भागातील घरात पाणी शिरले

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :  गुरुवार दुपारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने हाहाकार उडाला आहे. नदीनाल्यांना पूर आला असून अनेक रस्ते बंद झाले. सखल भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरुन पडझड झाली. बोदरा येथील तलाव फुटला असून कोणतीही जिवित हानी झाली नाही.

 गुरुवार दुपारपासून जोरदार पावसाला प्रारंभ झाला. रात्री उशीरापर्यंत पाऊस बरसत होता. शुक्रवारी पहाटे विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सकाळी ९ वाजतापासून सुरवात झाली. या पावसाने तुमसर ते येरली रस्त्यावरील नाल्याला पूर आल्याने पुलावरून तीन फुट पाणी वाहत आहे. त्यामुळे बंद झाला आहे. साकोली येथील एकोडी रोड परिसरातील अनेक घरामध्ये नवतलावाचे पाणी शिरले आहे. साकोली-तुमसर रस्ता चांदोरी गावाजवळ नाल्याला पूर आल्याने बंद आहे. तसेच साकोली-परसोडी, साकोली-विरसी-सातलवाडा ,साकोली-जमनापुर हे मार्गही बंद आहेत. बोदरा गावातील तलाव फुटला असून जीवीत हानी झालेली नाही. लाखनी तालुक्यातील मुरमाडी गावातील शिवनगर वॉर्डात पाणी वाढत असून काही घरात पाणी शिरले आहें.

रेंगेपार कोठा गावातील तलाव ओव्हर फ्लो होऊन गावात पाणी शिरत आहे.
मोहाडी आणि तुमसर तालुक्यातील अनेक घरांत पुराचे पाणी शिरले आहे. लाखनी तालुक्याच्या मऱ्हेगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्ग बंद आहे. भंडारा शहरातील अनेक भागातील घरांत पाणी शिरले असून घरांची पडझड झाली आहे.

 

Web Title: Continuous rains in Bhandara district; Bodra lake burst

टॅग्स :Rainपाऊस