कोका ते पलाडी रस्ता रात्री दहापर्यंत सुरु ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST2021-04-05T04:31:43+5:302021-04-05T04:31:43+5:30
मौजा कोका येथे वनविभागाचे विश्राम गृह तसेच अत्याधुनिक सुविधांयुक्त आसाम पॅटर्नचे बांबु हट व डारमेंटरी हाल आहे. वन्यजीव विभागामार्फत ...

कोका ते पलाडी रस्ता रात्री दहापर्यंत सुरु ठेवा
मौजा कोका येथे वनविभागाचे विश्राम गृह तसेच अत्याधुनिक सुविधांयुक्त आसाम पॅटर्नचे बांबु हट व डारमेंटरी हाल आहे. वन्यजीव विभागामार्फत संचालीत येथिल वनात सफारी करून कोका येथे येऊन पर्यटक मुक्कामी राहतात. कोका येथे राहण्याची सोय आहे पण जेवनाची व्यवस्था नाही. त्यामुळे पर्यटक मौजा चंद्रपुर येथे (कोका वरुन ६ की.मी.अंतरावर) राहण्याची व जेवनाची सोय असल्याने तिथे जातात.
परंतु परतीच्या वेळेस कोका ते पलाडी पर्यंत रस्ता सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु असल्याने कोका, नवेगाव, सर्पवाडा, चंद्रपुर, दुधारा, इंजेवाडा गावातील लोकांना अडचणीचा सामना करावा लागतो. रात्री बेरात्री आरोग्य बिघडले तर दवाखाण्यात जाण्याकरिता या मार्गावर जाण्या - येण्यास अडचणी निर्माण होतात. प्रसंगी जिवहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पर्यटकांना फार त्रास सहन करावा लागतो.
परिणामी सदर रस्ता रात्री दहा वाजेपर्यंत सुरु करण्यात यावे, तसेच मौजा कोका वनविश्रामगृह परिसरात राहण्याची सोय आहे जेवनाची सोय नसल्यामुळे कोका वनविश्राम गृह येथे किचन रुम किंवा जेवनाच्या व्यवस्थेकरिता एक खोली जिल्हा पर्यटक निधी योजनेअंतर्गत मंजुर करण्यात यावे. जेणेकरुन पर्यटकास दोन्ही सोयी उपलब्ध होतील. तसेच पर्यटकांना त्रास सहन करावा लागणार नाही, अशी मागणी कोका येथील सरपंच सरीता कोडवते, उपसरपंच शहारे, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय कोडवते, माजी जि.प. सदस्य उत्तम कळपाते, रविंद्र तिडके, तमुस अध्यक्ष तुकाराम हातझाडे व ग्रामस्थांनी आ. नरेद्र भोंडेकर तसेच वनाधिका ऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.