शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कंत्राटी डॉक्टरवर खापर फोडून वरिष्ठांना वाचविण्याचे षडयंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 6:04 AM

महिला डॉक्टरवर दबाव, ‘लोकमत’कडे डॉक्टरांचा ‘ड्युटी चार्ट’

इंद्रपाल कटकवार

भंडारा : देशाला हादरवून सोडणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडात महिला डॉक्टरचा बळी देण्याचे षडयंत्र रचले जात असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अभय देण्याचे षडयंत्र पुढे येत आहे. विशेष नवजात अतिदक्षता कक्षात नियुक्त कंत्राटी डॉक्टरला शुक्रवारच्या रात्री कोविड आयसोलेशन वॉर्डाचीही जबाबदारी देण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. यातून एकाच डॉक्टरवर दोन विभागाची जबाबदारी देण्यात आल्याची धक्कादायक बाब निदर्शनास येते. आठवडाभरातील डॉक्टरांच्या ड्यूटीचा चार्टच ‘लोकमत’च्या हाती लागला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून  ‘बचाव तंत्र’ सुरू झाले आहे. कुणाचा तरी बळी देऊन प्रकरण निस्तारण्याचे घाटत आहे. शुक्रवारच्या रात्री एनएससीयु कक्षात नियुक्त एका कंत्राटी डॉक्टरवर या प्रकरणाचे संपूर्ण खापर फोडून आरोग्य प्रशासन नामानिराळे होण्याच्या तयारीत आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, या डॉक्टरला संपूर्ण प्रकरण अंगावर घेण्यासाठी बाध्य केले जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. घटनेच्या रात्री तुम्ही कक्षात कर्तव्यावर होता, असे लिहून द्या, असे बजावण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘त्या’ रात्री संबंधित डॉक्टरला आयसोलेशन वॉर्डाची जबाबदारी देण्यात आली होती.

ड्युटीचे गौडबंगालडॉक्टरांचा ड्युटी चार्ट तयार होत असला तरी काेणते डॉक्टर्स कुठे काम करणार, याची माहिती नसते. डॉक्टर्स आपसात ‘सेटींग’ करून ड्युटी बदलवून घेतात. हीच अवस्था परिचारिकांच्या ड्युटीचीही आहे. त्यामुळे त्या काळरात्री नेमकी कोणती नर्स तेथे नियुक्त होती, हे कळायला मार्ग नाही. 

अशी होती ड्युटीn दर आठवड्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांची विभागनिहाय ड्युटी लावण्यात येते. ४ ते १० जानेवारीपर्यंतच्या तक्त्यानुसार, ८ जानेवारी रोजी विशेष नवजात अतिदक्षता विभागात दोन डॉक्टरांची ड्युटी होती. यातील एक डॉक्टर मानधन तत्त्वावर नियुक्त आहे. n शनिवारीसुद्धा याच डॉक्टरांची नियुक्ती तेथे होती. घटनेच्यावेळी डॉक्टर उपस्थित नसल्याचा मुद्दा पुढे आला आहे. यातील एक डॉक्टर कोविड आयसोलेशन वॉर्डात नियुक्त होते. n एकीकडे कागदोपत्री दोन्ही विभागात काम करणाऱ्या डॉक्टरला या प्रकरणात गोवून त्यांचा बळी घेण्याचा घाट स्थानिक आरोग्य यंत्रणेने घातला. 

 

 

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगdoctorडॉक्टर