शेळी-मेंढी खरेदीला प्रधान सचिवांची संमती
By Admin | Updated: July 10, 2016 00:17 IST2016-07-10T00:17:13+5:302016-07-10T00:17:13+5:30
भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता आपल्याच परिसरातील शेळ्या खरेदी करता येतील.

शेळी-मेंढी खरेदीला प्रधान सचिवांची संमती
काशीवार यांच्या प्रयत्नांना यश
साकोली : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता आपल्याच परिसरातील शेळ्या खरेदी करता येतील. यासाठी साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांनी पशुसंवर्धन मंत्रालयातून परवानगी घेऊन भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ४०+२ शेळी गट योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अहिल्यादेवी होळकर शेळीमेंढी विकास महामंडळ प्रयोग क्षेत्र पोहरा (जि.अमरावती) येथून खरेदी करणे बंधनकारक होते. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील पात्र शेतकरी हा तिथूनच शेळ्या विकत घेत असे, मात्र या शेळ्यांना आपल्या परिसरातील वातावरण त्यांना पोषक नसल्याने कित्येक शेळ्या मरण पावल्या. ही बाब लाभार्थ्यांनी आ. बाळा काशिवार यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर आ. काशिवार यांनी संबंधित अधिकारी यांच्याशी यावर चर्चा करून तसा अहवाल पशुसंवर्धन विभागाला दिला. पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याच परिसरातील शेळ्या घेता याव्या याची विनंती केली. प्रधानसचिवांनी आ. काशीवार यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान सहमती तशी संमती दिली. (तालुक प्रतिनिधी)
शासनातर्फे शेतकरी व इतरही लोकांना अनेक योजनाच्या माध्यमातून उदरनिर्वाहाच्या योजना आहेत मात्र या योजनेत काही जाचक अटी आहेत. लाभ लाभार्थ्यांना होत नाही. परिणामी योजना सपेशल अयशस्वी ठरते. त्यामुळे या योजनेत काही सुधारणा करणे गरजेचे आहे.
- बाळा काशीवार
आमदार, साकोली