इंधन दरवाढीविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 01:00 IST2019-07-11T00:59:52+5:302019-07-11T01:00:45+5:30

केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर अधिभार लावल्याने त्यांच्या दरात प्रति लिटर अडीच रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीच्या विरोधासह विविध मागण्यांसंदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने स्थानिक त्रिमूर्ती चौकात बुधवारी निदर्शने करण्यात आली.

Congress movement against fuel price hike | इंधन दरवाढीविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन

इंधन दरवाढीविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन

ठळक मुद्देभंडारात निदर्शने : जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर अधिभार लावल्याने त्यांच्या दरात प्रति लिटर अडीच रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीच्या विरोधासह विविध मागण्यांसंदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने स्थानिक त्रिमूर्ती चौकात बुधवारी निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले. हातात काँग्रेसचा ध्वज घेतलेले काँग्रेस कार्यकर्ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढील त्रिमुर्ती चौकात एकात्र आले. तेथे त्यांनी इंधन दरवाढी विरुद्ध सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर एक निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. त्यात विविध मागण्यांचा समावेश होतो. खरीप हंगामात शेतकºयांना पीक कर्जाच्या नावाखाली राष्ट्रीकृत बँकांकडून अडवणूक होत आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जेमतेम २५ टक्के पीक कर्ज वाटप झालेले. यामुळे शेतकºयांची अवस्था बिकट झाली आहे. बँकांनी शेतकºयांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, पेट्रोल-डिझेलच्या वाढीव किमती मागे घ्याव्यात, या मागणी सोबत रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटी प्रकरणी सरकारने तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाई करावी, मुंबई येथे भिंत कोसळून २७ जणांचे बळी गेले. सुमारे २१ कोटी रुपये खर्च करून दीड वषार्पुर्वीच ही भिंत बांधण्यात आली होती. बांधकामात गैरप्रकार झाल्याने ही भिंत कोसळल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला. भाजप-शिवसेनेच्या काळात पाच वर्षांपासून सातत्याने गैरप्रकार करणाºयांना संरक्षण दिले जाते. अनेक प्रकरणात विरोधीपक्ष आणि आरटीआय कार्यकर्त्यांनी अनेकदा ठोस पुरावे देऊनही सरकारने गैरप्रकार करणाºयांना क्लीन चिट देण्याची भूमिका घेत्याचे या निवेदनात म्हटले आहे.
मधुकर लिचडे, विकास राऊत, अशोक मोहरकर, राजकपूर राऊत, प्रेमदास वनवे, महिला जिल्हा अध्यक्षा सीमा भुरे, महेंद्र निंबार्ते, मुकुंद साखरकर, शंकर तेलमासरे, भूमेश्वर महावाडे, डॉ चंद्रकांत निंबार्ते, प्रशांत देशकर, रणवीर भगत, आणिक जमा पटेल, चित्रा सावरबांधे, प्यारेलाल वाघमारे, सचिन घनमारे, जयश्री बोरकर, शमीम शेख, कमलाकर रायपूरकर, धनराज साठवणे, मार्कंड भेंडारकर, मंगेश हुमने, मनोहर उरकूडकर, उत्तम भागडकर, विशाल तिरपुडे, पृथ्वी तांडेकर, प्रिया खंडाते, भाऊ कातोरे, सुरेखा सहारे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Congress movement against fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.