शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या डागावरील युनानी औषधांचा ठणठणाट

By admin | Updated: January 15, 2017 00:33 IST

पांढऱ्या डागांचा आजार बरा होत नसलेल्या रुग्णांनी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.

रुग्णाची हेळसांड : मोहाडी ग्रामीण रुग्णालयातील प्रकारसिराज शेख मोहाडीपांढऱ्या डागांचा आजार बरा होत नसलेल्या रुग्णांनी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. येथे युनानी पद्धतीच्या औषधोपचाराने रूग्णांना लाभ झाला. मात्र आता या आजारावरील औषधीच रुग्णालयात उपलब्ध नसल्याने औषधीसाठी अशा रुग्णांना पायपीट करावी लागत आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.शासनाने काही दिवसापूर्वी अनावश्यक औषधी खरेदी करून रुग्णालयाला पाठविली होती व ते प्रकरण बरेच गाजले होते. दुसरीकडे आवश्यक औषधींचा तुटवडा असल्याने रुग्णांत असंतोष आहे. मोहाडी ग्रामीण रुग्णालयात आयुष विभागांतर्गत आयुर्वेदिक, होमीयोपॅथी व युनानी औषधोपचार पद्धती सुरु आहे. मात्र यापैकी बहुतांश पद्धतीची औषधेच उपलब्ध नाहीत. मोजक्या स्वरुपात औषधांचा साठा येथे पाठविला जातो. जो आठ दिवसातच संपतो. या विभागातील शरीरावर पांढऱ्या डागांसाठी युनानी औषधोपचार पद्धती रामबाण उपाय ठरली आहे. साधारणत: पांढरे व्रण असणाऱ्या व्यक्तींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. औषधोपचार करूनही हा आजार पूर्णत: बरा होत नाही. मात्र युनानी औषधाने त्यांच्यात आशेचा किरण उगवला आहे. या औषधोपचाराने साकोली तालुक्यातील एकोडी येथील ६५ वर्षीय महिलेला ९० टक्के लाभ झाला. त्यांना मागील १६ वर्षापासून हा आजार होता. त्यांनी अनेक प्रकारची औषधी घेतली. मात्र त्यांना लाभ झाला नव्हता. तसेच रामटेक, खरबी, पालडोंगरी, रोहा, सालई (खुर्द), विहीरगाव, तुमसर आदी अनेक गावांमधील रूग्णांना युनानी औषधोपचाराने पांढऱ्या व्रणावर लाभ झाला आहे. त्यामुळे या प्रकारच्या रुग्णांची संख्या मोहाडी ग्रामीण रुग्णालयात दिवसेंदिवस वाढतच असून १०० च्या वर रुग्ण येथे उपचारासाठी येत आहेत. मात्र पांढऱ्या डागावरील मुख्य सफुकेबर्स औषधच रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे काही रुग्णांनी भंडारा जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेऊन औषध तुटवड्यामुळे होणारी व्यथा मांडली. मात्र अजूनपर्यंत तोडगा निघालेला नाही. पांढऱ्या डागांच्या रुग्णांना युनानी औषधोपचार पद्धतीने त्यांना पुन्हा नवीन जीवन जगण्याची आशा पल्लवीत केली. मात्र, औषधांचा तुटवडा असल्याने रूग्णांना आल्यापावली परतावे लागत आहे. अनेकांच्या शरीरावरच पांढरे डाग नाहिसे होऊन सामान्यांसारखी त्वचा झाली आहे. वयात आलेल्या मुलींचे लग्न पांढऱ्या डागांमुळे जमत नव्हते. आता त्यांच्या जीवनात आशेचे किरण दिसायला लागले आहेत. पांढऱ्या डागांवरील औषधे जवळपास पाच ते सहा महिने द्यावी लागतात. तेव्हाच हा रोग पूर्णत: बरा होतो. मात्र रुग्णालयातील औषधांच्या तुटवड्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाने याबाबीची तातडीने गंभीर दखल घेऊन तुटवडा पडलेला औषधींचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.या विषयावर मी नंतर बोलेन. सध्या मी मिटींगसाठी पुण्यात आलो आहे. ही औषध कमी प्रमाणात उपलब्ध झाली आहेत.- डॉ.रवीकांत धकाते, जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारापांढऱ्या डागांवरील औषधांचा पुरवठा बंद आहे. तरी आम्ही रुग्ण कल्याण निधीमधून ही औषधे खरेदी करीत आहोत. मात्र १०० च्या जवळपास रुग्ण असल्याने तेवढी रक्कम खर्च करणे अपेक्षित नाही. एक दोन दिवसात पुन्हा ही औषधी खरेदी करणार आहोत.- डॉ.हंसराज हेडाऊ, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय मोहाडी.