शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

पेपर फुटीवर आळा घालण्यासाठी समिती

By admin | Updated: May 23, 2017 00:17 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेतील पेपर फुटीच्या प्रकारांना आळा घालण्याकरिता आणि त्यावर उपाययोजना करण्याकरिता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

१० व १२ वीच्या परीक्षेतील प्रकार : समिती सादर करणार दोन महिन्यांत अहवालमोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेतील पेपर फुटीच्या प्रकारांना आळा घालण्याकरिता आणि त्यावर उपाययोजना करण्याकरिता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा सुरु होण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका या समाज माध्यमावर (सोशल मीडिया) आल्याचा घटना घडल्या होत्या. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ही समिती देखरेख ठेवणार आहे.नियोजनबध्द व सर्व घटक समावेशक असा ‘गैरमार्गाशी लढा’ या अभियानाचा कृती कार्यक्रम मागील वर्षापासून राज्य मंडळामार्फत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. त्यामुळे परिक्षेतील संबंधित घटकांचा वैचारिक मनोवृत्तीमध्ये सकारात्मक बदल होण्यासाठी आणि परिक्षेतील गैरप्रकार कमी करण्यासाठी मदत झाली. गुणवत्ता वाढीसाठी व जबाबदार भावी पिढी निर्माण व्हावी, याकरिता कॉपीमुक्त अभियानासारखे उपक्रम राबविण्यात येत आहे.राज्य परिक्षा मंडळामार्फत फेब्रुवारी - मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक (१२ वी) परिक्षा सुरु होण्यापुर्वी काही मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका समाज माध्यमावर आल्याच्या घटना घडल्याचे निदर्शनास आली. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागात खलबते झाली. त्यानंतर परिक्षेत घडणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्याकरिता उपाययोजना सुचविण्याकरिता समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी शिक्षण आयुक्त राहतील. सदस्यांमध्ये पोलीस आयुक्त मुंबई किंवा त्यांचे प्रतिनिधी, विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर कक्ष किंवा त्यांचे प्रतिनिधी, सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा त्यांचे परिक्षेचे नियोजन करणारे प्रतिनिधी, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), सीबीएससी यांचे प्रतिनिधी, आयुक्त महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषद पुणे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे सदस्य सचिव यांचा समावेश आहे.सहसचिवांचे आदेश निर्गमितसदर समितीने प्रश्नपत्रिका परिक्षेच्या काही मिनीटे आधी समाज माध्यमावर प्रसारित होण्याची कारणे, परिक्षा नियोजनातील त्रुटी, करावयाच्या उपाययोजना अशा स्वरूपाच्या घटना घडू नये आणि कॉफी प्रतिबंध, परिक्षेतील गैरप्रकार रोखण्याकरिता आवश्यक अधिनियम, नियम आदीबाबत अभ्यास करून आपला अहवाल दोन महिन्यात सादर करावयाचा आहे. यात तज्ज्ञानासुध्दा आमंत्रित करण्यात येणार आहे. अशा आशयाचे निर्देश राज्य शासनाचे शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ.सुवर्णा खरात यांनी दिले आहे. डॉ.खरात यांच्या स्वाक्षरीनिशी सदर आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे.