शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्याच्या विकासासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:53 IST

महाराष्ट्र शासनाने मागील चार वर्षात भंडारा जिल्हा विकासासाठी भरीव कार्य केले असून जलयुक्त शिवार, शेतकरी सन्मान योजना, आरोग्य, शिक्षण, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन, महसूल प्रशासन व कृषि क्षेत्रात विकासाला नवी दिशा दिली आहे.

ठळक मुद्देमहादेवराव जानकर : पोलीस कवायत मैदानावर शासकीय ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र शासनाने मागील चार वर्षात भंडारा जिल्हा विकासासाठी भरीव कार्य केले असून जलयुक्त शिवार, शेतकरी सन्मान योजना, आरोग्य, शिक्षण, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन, महसूल प्रशासन व कृषि क्षेत्रात विकासाला नवी दिशा दिली आहे. यापुढेही शासन जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिली.स्वातंत्र्य दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे व विविध विभागाचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.शेती विकास व शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदु असून कर्जात असलेल्या शेतकºयांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६५ हजार २८५ शेतकºयांना १८२ कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील ५५ हजार ४०६ शेतकºयांना २७६ कोटी रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.ना. जानकर म्हणाले, तुडतुडा रोगाच्या प्रादुर्भावामुळे धान पिकांच्या नुकसानीसाठी शासनाने मदत जाहिर केली. प्रशासनाने जिल्ह्यातील १ लाख ६५ हजार २८८ शेतकºयांच्या बँक खात्यात ६२ कोटी ७१ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १ लाख ५४ हजार २६३ भूमीधारी शेतकरी कुटुंब भूमीस्वामी होणार आहेत. यापैकी एक लाख ११ हजार ९२६ गट वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये परावर्तीत करण्यात आले आहे. उर्वरित गटांची प्रक्रिया वेगाने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.मागील तीन वर्षात जिल्ह्यातील २०१ गावात जलयुक्त शिवारची कामे घेण्यात आली. त्यापैकी १८७ गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. मागील दोन वर्षात झालेल्या कामांमुळे ८१ हजार ५३९ टिसीएम पाणी साठा निर्माण झाला आहे. यामुळे ३८ हजार ३२३ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. एका पाण्याने वाया जाणाºया धानाला जलयुक्त शिवारमुळे संजिवनी मिळाली आहे. या कामामुळे जलस्तर वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. वैरण विकासावर भर देण्यासाठी आत्मांतर्गत १६ पशुवैद्यकीय दवाखान्यात वैरण बाग तसेच आझोला युनिट तयार करण्यात आले आहे. त्यापासून शेतकºयांना वैरण लागवडी करीता वैरण ठोंब्यांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील तीन वर्षात ७ हजार ७०० कृषी पंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री हरघर बिजली सौभाग्य योजनेत जिल्ह्यातील ८ हजार ४०० लाभार्थ्यांना नवीन वीज जोडणी देण्यासाठी ५ कोटी ९४ लाखाचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. लवकरच या लाभार्थ्यांच्या घरात वीजेचा प्रकाश पोहचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने युवा माहिती दूत हा उपक्रम सुरु होत आहे.जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत १२२३ गावांमध्ये फिरते पोलीस ठाणे उपक्रम घेण्यात आला यामध्ये ५८ हजार लोकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी २५४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रांरभी पोलीस विभागाच्या वतीने पथ संचलन करण्यात आले. यावेळी विविध विभागाच्या वतीने चित्ररथ काढण्यात आले. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसMahadev Jankarमहादेव जानकर