ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पुढे या
By Admin | Updated: January 18, 2016 00:31 IST2016-01-18T00:31:07+5:302016-01-18T00:31:07+5:30
समाजाच्या सर्वांगिण विकासाकरिता शिक्षण महत्वाचे पैलू आहे. स्पर्धा वाढत असताना आपण मागे न पाहता पुढे पुढे जाण्याची जिद्द बाळगत ...

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पुढे या
स्नेहमिलन सोहळा : नाना पटोले यांचे आवाहन, झाडे कुणबी समाज संस्थेचा उपक्रम
भंडारा : समाजाच्या सर्वांगिण विकासाकरिता शिक्षण महत्वाचे पैलू आहे. स्पर्धा वाढत असताना आपण मागे न पाहता पुढे पुढे जाण्याची जिद्द बाळगत स्वत:च्या संविधानिक हक्काकरीता ओबीसी समाजबांधवांनी पुढे येण्याची आज खरी गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
भंडारा येथील झाडे कुणबी समाजसंस्थेच्या वतीने आयोजित स्नेहमिलन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अमररत्न तवाडे, महाराज होते, अतिथी म्हणूप गोंदिया जिल्हा परीषद अध्यक्षा उषा मेंढे प्रा.अनुपम मेंढे, अॅड.वसंत चुटे, मनोहर महावाडे, ताराचंद चुटे, संस्थाध्यक्ष पांडुरंग फुंडे आदी उपस्थित होते. झाडे कुणबी समाजसंस्थेच्या वतीने पल्स पोलिओ मोहिम यावेळी राबविण्यात आला. समाजातील होतकरू व प्राविण्यप्राप्त विद्यार्थी चिन्मय खोटेले, ऋतूजा ब्राम्हणकर, जान्हवी शिवणकर, योगेंद्र बागडे, सोनाली मेंढे, यश फुंडे, तुषार भेंडारकर, स्नेहल मेंढे, खुशबू भेंडारकर, भाग्यश्री शिवणकर, कोमल हत्तीमारे या १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
खासदार पटोले म्हणाले, ओबीसींच्या सर्वांगिण विकासाकरिता स्वतंत्र मंत्रालयाची मागणी रेटून धरली आहे. तुकाराम महाराजांचे वंशज भाग्यदायी आहोत. तेव्हा कर्माला गती द्या, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, अधिकाराकरिता कलम ३४० नुसार मिळालेली नाहीत. मुठभर लोकांच्या हातात सत्ता केंद्रीत असल्याने बहुजनांची चळवळ महत्वाची आहे. एकमेकांना सहकार्य करून विकास साधा. हक्क मिळवायला संघर्ष करा. प्रास्ताविक पांडुरंग फुंडे यांनी केले. ते म्हणाले, समाज माझा, मी समाजाचा म्हणत एकमेकांना सहकार्य करा. समाजसंस्थेच्या वतीने खासदार नाना पटोले व माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, आ.रामचंद्र अवसरे यांनी आर्थिक सहकार्य करीत समाजसंस्थेला मजबूत केले. क्रिमिलेअरची मर्यादा वाढवून देण्याची व गोसेखुर्द अंतर्गत अल्पभूधारकांना हक्क मिळावा. ओबीसीला शिष्यवृत्ती मिळावी अशा मागण्या खा.नाना पटोले यांना केल्या. रांगोळी स्पर्धा घेण्यात येऊन कौटुंबिक हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष पांडूरंग फुंडे, संचालन सारिका दोनोडे तर आभार निता चुटे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)