शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: November 9, 2014 22:28 IST

आमगाव येथे कवलेवाडा रस्त्यावर कचऱ्याचा ढिगारा निर्माण झाल्याने दुर्गंधी निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना रस्त्यावरुन आवागमनासाठी त्रास सहन करावा लागत आहे.

आमगाव/दिघोरी : आमगाव येथे कवलेवाडा रस्त्यावर कचऱ्याचा ढिगारा निर्माण झाल्याने दुर्गंधी निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना रस्त्यावरुन आवागमनासाठी त्रास सहन करावा लागत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी ग्रामपंचायतला गावकऱ्यांनी केली असता ग्रामपंचायत पदाधिकारी कानाडोळा करीत आहे.दरवर्षी ग्राम प्रशासनातर्फे गावातील नाल्या व कचरा साफ करण्यात येते. मात्र यावर्षी या ठिकाणावरील जमा झालेला कचरा उचलण्यात आला नाही. त्यामुळे कचऱ्याचा ढिग जमा झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना या ठिकाणाहून जाण्यासाठी फार त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणाहून पायी जाणे जिवावर येत असते. ही समस्या मागील अनेक वर्षापासून निर्माण झाली असली तरी या समस्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतने कोणत्याच प्रकारचा पुढाकार घेतला नाही. गावातील नाल्या तुडूंब भरल्या असून जागो जागी पाणी साचत आहे. यावर्षी डेंग्यू सदृश्य तापाची लागण झाली होती. पाच ते सहा रुग्णांना सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते. मागील आठवड्यामध्ये वंदना मेश्राम या महिलेला तापामुळे नागपूर येथील मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. गावामध्ये कचरा गाडीचा वापर कधीच करण्यात आला नाही. गंगाधर बडवाईक यांच्या घराजवळील हातपंपापासून ते हरीभाऊ सार्वे यांच्या घरापर्यंत असलेली नाली बारामाही वाहत असते. नाली शेवटच्या टोकावर अरूंद असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. जागोजागी पाणी साचत राहते. ही नाली अरूंद असलेल्या ठिकाणाहून रूंद करण्याची मागणी सार्वे यांनी ग्रामपंचायतला अनेकदा केली. राष्ट्रीय स्वच्छता मिशन अंतर्गत भंडारा पंचायत समितीमध्ये आमगाव हे गाव समाविष्ट करण्यात आले. त्यानुसार ३७० शौचालय बांधकाम करण्याचे मंजूर झाले. हे उद्दिष्ट मार्च १५ पर्यंत पूर्ण करायचे असताना आतापर्यंत जेमतेम २० ते ३० शौचालयाचे काम सुरू असल्याने या मिशनचा बोजवारा वाजला आहे. (वार्ताहर)