शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

शहरातील वाहतुकीचा बट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 9:53 PM

स्मार्ट शहराच्या नावाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यांचे काम सुरु आहे. या रस्त्याच्या कामाने वाहतुकीची कायम कोंडी होत आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर गत सहा महिन्यात कोणताच तोडगा काढला नाही.

ठळक मुद्देपार्र्किं गचा प्रश्न : खड्डेमय अर्धवट रस्त्यांची समस्या, नागरिक झाले त्रस्त

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्मार्ट शहराच्या नावाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यांचे काम सुरु आहे. या रस्त्याच्या कामाने वाहतुकीची कायम कोंडी होत आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर गत सहा महिन्यात कोणताच तोडगा काढला नाही. परिणामी वाहतुकीचा कोंडमारा होत असतून कोणत्या रस्त्याने जावे अशा प्रश्न वाहनधारकांना सारखा सतावत असतो.शहरातील जिल्हा परिषदचौक ते खात रोड या रस्त्याचे चौपदरीकरण केले जात आहे. सहा महिन्यापुर्वी या कामाला प्रारंभ झाला. सुरुवातीला काही कारणास्तव काम रोखण्यात आले. त्यानंतर कामाने वेग घेतला परंतू महिना संपलातरी काम पूर्णच झाले नाही. या रस्त्यावर शहरातील सर्वाधिक वाहतुक असते. परंतू रस्ता एका बाजूने खोदलेल्या आहे. त्या रस्त्यावरुन चालताना अनेकदा कसरत करावी लागते. मोठे वाहन आले की तासनतास् वाहतूक ठप्प होते. राजीव गांधी चौकात तर वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहे. कोण कोणत्या बाजूने येईल याचा नेम नाही. चुकीच्या बाजूने वाहन आल्यास वाहतुकीची कोंडी होते. भर उन्हात दुचाकीस्वारांना कोंडीत फसावे लागते. साई मंदिर रोड, शितलामाता चौक येथेही असाच अनुभव येतो.रस्त्याच्या कामाने वाहतुक कोंढी हा प्रकार समजूनही घेता येईल. मात्र शहरातील इतर भागातही वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. शहरातील गांधी चौक, बसस्थानक परिसर आदी ठिकाणी पार्र्किंगची व्यवस्थाच नाही. अनेक व्यावसायीकांची आपली दुकाने रस्त्यावर थाटली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. बाजार, बसस्टँड, मुस्लिम लायब्ररी चौकात जाणाºया रस्त्यावर सिग्नल व्यवस्था नाही. रस्त्यावर मनमर्जीने वाहन चालविले जातात. शहरात वाहतुक पोलिसांची नियुक्ती असली तरी तेही हतबल झाल्याचे दिसून येतात. विशेष म्हणजे बसस्थानक, गांधी चौक, राजीव गांधी चौक, साई मंदिर या परिसरात शाळा, बँका, हॉस्पीटल अनेक शोरुम आहेत. त्यामुळे वर्दळ असते त्या वर्दळीत अपघात होण्याची कायम भीती असते.अधिकृत पार्किंग गरजेचीशहरातील गांधी चौक, राजीव गांधी चौक, शितलामाता मंदिर, मेन बाजार परिसरात कुठेही पार्किंगची व्यवस्था दिसत नाही. नो पार्किंग असलेल्या ठिकाणी वाहने उभे केली जातात. पोलीसही त्यांच्यावर कारवाई करीत नाही. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत वाहने अधिक आहेत. रस्ते गुळगुळीत करताना पार्किंगचीही सुविधा गरजेची झाली आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी