शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

धानपिकांसाठी रसायनयुक्त पाणी!

By admin | Updated: August 30, 2016 00:21 IST

वाहत्या नाल्यात एका कारखान्यातील विषारी रसायनयुक्त पाणी सोडण्यात आले. सध्या धानपिकाला पाण्याची गरज आहे.

तुमसर : वाहत्या नाल्यात एका कारखान्यातील विषारी रसायनयुक्त पाणी सोडण्यात आले. सध्या धानपिकाला पाण्याची गरज आहे. विषारी पाणी पिकांना कसे द्यावे असा प्रश्न देव्हाडी शिवारातील शेतकऱ्यांना पडला आहे. वारंवार रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कारखान्यावर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.देव्हाडी शिवारात तुमसर - गोंदिया राज्य महामार्गावर एक औषध निर्माण करणारा कारखाना आहे. कारखान्याशेजारी एक नाला वाहतो. या नाल्यात कारखान्यातील रसायनयुक्त पाणी सोडण्यात येते. या पाण्याची दुर्गंधी येते. शेतकरी सध्या धान पिकाकरिता पाण्याची नितांत आवश्यकता आहे. नाल्यात रसायनयुक्त पाणी असल्याने धानपिकाला पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दोन वर्षापूर्वी रसायनयुक्त पाणी धान पिकाला दिले होते. तेव्हा धान मळणी केल्यावर त्या तांदळाची दुर्गंधी येत होती. शेतकऱ्यांनी सर्व तांदूळ फेकून दिले होते हे विषेश. येथील शेतकऱ्यांत असंतोष आहे. कारखाना प्रशासन सतत रसायनयुक्त पाणी सोडत असून प्रशासनाकडून कोणतीच दखल आजपर्यंत घेण्यात आली नाही. शेकडो शेतकऱ्यांचे पिक पाण्याअभावी धोक्यात आले आहे.पर्यावरणाची येथे मोठी हानी होत आहे. गुरांना पिण्याकरिता पाणी नाही. नियमानुसार कारखाना प्रशासनाने रसायनयुक्त पाणी निष्प्रभ करण्याची गरज आहे. प्रदूषण व पर्यावरण विभागाचे जबाबदार अधिकारी भेट देतात. परंतु क्लिन चीट देण्याचेच येथे सुरु आहे. रसायनयुक्त पाणी नाल्यात सोडताच येत नाही. शासनाचे अतिशय कडक नियम आहेत. परंतु येथे या नियमांचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. (तालुका प्रतिनिधी)शेतकऱ्यांची तक्रार आल्यावर तिची दखल घेऊन चौकशी करण्यात येईल. नियमानुसार संबंधित कारखान्याला जाब विचारून नियमानुसार निश्चित कारवाई करण्यात येईल.- डी.टी. सोनवानेतहसीलदार, तुमसर.