शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

‘खवा’ बनविण्याचे कोंढा बनले केंद्र

By admin | Updated: November 16, 2014 22:44 IST

कोंढा व कोसरा येथे खवा निर्मितीसाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात भट्या लावल्या आहेत. दुधापासून खवा, मिठाई, मनीर बनवून येथून विकले जात आहे. यासाठी काहींनी अन्न व औषधी

कारवाईची गरज : खासगी डेअरीतून दुधाची खरेदीकोंढा कोसरा : कोंढा व कोसरा येथे खवा निर्मितीसाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात भट्या लावल्या आहेत. दुधापासून खवा, मिठाई, मनीर बनवून येथून विकले जात आहे. यासाठी काहींनी अन्न व औषधी प्रशासनाची मान्यता घेतली तर काहींनी विनापरवाना दुकानदारी थाटली आहे.कोंढा परिसरात सध्या सर्वसामान्यपणे खवा निर्माण करण्याचे प्रकार वाढले आहेत. या कामात अनेक लोक गुंतले आहेत. परिसरात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने काही परप्रांतीय लोकांनी येथे दुधापासून खवा निर्माण करण्याच्या भट्या लावल्या आहेत. याशिवाय दुधापासून पनीर, मिठाई बनवून बोऱ्यामध्ये भरून दुसऱ्या जिल्ह्यात पाठविले जात आहे. यासाठी खासगी एस.टी. वाहनाचा वापर केला जात आहे.कोंढा येथे प्रसिद्ध म्हैस बाजार आहे. येथे गाय, म्हैस यांची खरेदी विक्री होत असल्यामुळे पशुपालकांची संख्या परिसरात मोठी आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांनी कोंढा व परिसरात दूध खरेदी केंद्र सुरु केले आहे. दुधात अस्वच्छ पाणी मिसळविले जाते. तसेच फॅट वाढविण्यासाठी अनेक पदार्थांचे मिश्रण केले जात आहे. संघाच्या डेअरी केंद्रावर फॅट व दुधाची भेसळ तपासली जात असल्याने दुग्ध उत्पादक खासगी दुग्ध संकलन केंद्रावर दूध विकतात. याचा फायदा खवा उत्पादन करणारे खासगी डेअरीचे दूध खरेदी करून खवा, पनीर, मिठाई बनवितात.दुधात भेसळ करून हा प्रकार सुरु असताना अन्न व औषधी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. दूध, दही, फळ, भाजीपाला हे सर्वसामान्याच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असल्याने हे पदार्थ भेसळमुक्त असावयास पाहिजे. परंतु जास्त पैशाच्या मोहामुळे भेसळकरून पदार्थ विकत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे सर्वसामान्याच्या आजारात वाढ झाली आहे.दूधापासून खवा, मिठाई, पनीर बनविले जाते. अनेकांकडे याचा परवाना देखील नाही. खवा बनविण्यासाठी घरी एक भट्टी लावली जाते. भट्टीचे धूर आजूबाजूच्या घरात जाते. त्यामुळे तेथील अनेकांच्या घरात शिरत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. भट्टी सुरु करण्यासाठी ग्राम पंचायत कार्यालयाची परवानगी असणे आवश्यक आहे. पण ती परवानगी देखील घेतली नसल्याचे निदर्शनात आले आहे. (वार्ताहर)