काेविडचा कचरा ठरताेय घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:32 AM2021-07-26T04:32:39+5:302021-07-26T04:32:39+5:30

इंद्रपाल कटकवार भंडारा : दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाल्याने अन्य ठिकाणी तत्काळ स्वरूपात काेविड सेंटर सुरू करण्यात आले ...

Cavid waste is dangerous | काेविडचा कचरा ठरताेय घातक

काेविडचा कचरा ठरताेय घातक

Next

इंद्रपाल कटकवार

भंडारा : दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाल्याने अन्य ठिकाणी तत्काळ स्वरूपात काेविड सेंटर सुरू करण्यात आले हाेते. यापैकी शहरातील ऐतिहासिक शाळा असलेल्या लालबहादूर शास्त्री विद्यालयात काेविड सेंटर उभारण्यात आले. हळूहळू रुग्णसंख्या कमी हाेत गेली. परिणामी काेविड सेंटरही रिकामे झाले. मात्र, याठिकाणची स्वच्छता झाली नाही. आता हाच काेविडचा कचरा घातक ठरू पहात आहे. स्वच्छतेसाठी अजूनही जिल्हा आराेग्य विभागाची अनदेखी हाेत आहे. तर दुसरीकडे शाळा सुरू झाल्यास आम्ही काय करावे असा प्रश्न शाळा व्यवस्थापन समितीसमाेर उभा राहिला आहे.

विश्वात काेराेना महामारीने सर्वांनाच सळाे की पळाे करून साेडले. राज्यात त्यातही भंडारा जिल्ह्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढत हाेती. १४०० पेक्षा रुग्ण एकाच दिवशी आढळत असल्याने तमाम शासकीय व खासगी काेविड रुग्णालये हाऊसफूल झाली. काेराेना रुग्णांना क्वाॅरंटाईन ठेवण्यासाठी जागा शाेधण्यात आली. शाळा बंद असल्याने तर काही ठिकाणी सभागृहांचा आसरा घेण्यात आला. शहरातील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील ज्युनिअर सेक्सनमधील तब्बल १२ खाेल्यांमध्ये काेविड रुग्णांची साेय करण्यात आली. सुरुवातीला सर्व काही आलबेल चालले. हळूहळू रुग्णसंख्या कमी हाेत गेल्याने येथील रुग्णही घरी परतले. शेवटच्या वेळी चार ते पाच रुग्ण उपस्थित असताना या दिवशीपासूनच या परिसराची स्वच्छता ठप्प पडली. आताही खाेल्यांमध्ये गाद्या पडून असून धूळ साचली आहे. खाेल्यांबाहेर मास्क, कापसाचे बाेंडे व अन्य साहित्य पडले आहे. सध्या शाळा बंद आहे. मात्र, शाळा सुरु झाल्यास, अशा धाेकादायक परिसरात शाळांमध्ये पाल्य काेण पाठविणार असा सवाल उपस्थित हाेत आहे.

एकमेकांकडे बाेट

जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनंतर शाळेतील वर्गखाेल्या काेविड रुग्णांसाठी वापरण्यात आल्या. आराेग्य विभागाचे साहित्य याठिकाणी आणण्यात आले. मात्र, यावेळी स्वच्छतेची जबाबदारी कुणाची अशा प्रश्न उपस्थित राहिला. आधीच जिल्ह्यात अनेक शिक्षकांची काेविड काळात नियुक्ती करण्यात आली हाेती. त्यातच शिक्षकांनीच किंवा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ही स्वच्छता करावी काय? आराेग्य विभागाचे कर्तव्य काेणते? यासाठी एकमेकांकडे बाेट दाखविण्याचा प्रतापही येथे पहावयास मिळत आहे. खऱ्या अर्थाने आराेग्य विभागाने शाळा परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी घ्यायला हवी हाेती. मात्र तसे काही झाले नाही.

काेटबाॅक्स

सर्वांनाच आपल्या जीवाची भीती असते. मुख्याध्यापक म्हणून स्वच्छता संदर्भात आदेश द्यायला हरकत नाही. मात्र, येथे साधारण नव्हे तर काेविड सेंटर हाेते. या संदर्भात जिल्हा आराेग्य प्रशासनाने दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे.

- केशर बाेकडे

प्राचार्य शास्त्री विद्यालय भंडारा

Web Title: Cavid waste is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.