शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

भाकपने महागाई विरोधात दिले धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:07 PM

स्थानिक मागण्यांचे निवेदन तहसीलदाराला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या देशव्यापी महागाई विरोधी आंदोलनाच्या आवाहनानुसार दि.२० जून ला भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आणि एका शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतीच्या नावे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देराष्ट्रपतींच्या नावे निवेदन : जीवनावश्यक वस्तूंचा स्वस्त दरात पुरवठा करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्थानिक मागण्यांचे निवेदन तहसीलदाराला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या देशव्यापी महागाई विरोधी आंदोलनाच्या आवाहनानुसार दि.२० जून ला भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आणि एका शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतीच्या नावे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.शिष्टमंडळात भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य शिवकुमार गणवीर, जिल्हा सचिव हिवराज उके, राज्य कौंसील सदस्य माधवराव बांते, सदानंद इलमे व शांताबाई बावनकर यांचा समावेश होता.निवेदनात पेट्रोल डिझेलवरील सर्व प्रकारच्या करामध्ये कपात करून किंवा पेट्रोल डिझेलला जीएसटी खाली आणून त्यांचे दर ५० रु. प्रती लिटरच्या खाली आणण्यात यावे, वीज, एसटी बसचे तिकीट दर, रासायनिक खते, कीटकनाशके बियाणे, सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत गहू, तांदूळ या सह केरोसीन, साखर व इतर जीवनावश्यक वस्तूंचा स्वस्त दरात पुरवठा करण्यात यावा, घरगुती गॅसचे वाढविलेले दर कमी करून ते २०१४ च्या पातळीवर आणण्यात यावे, त्याचप्रमाणे उज्ज्वला गॅस योजनेवर सबसिडी देण्यात यावे या मागण्यांचा समावेश होता.दरम्यान जिल्हाधिकारी शांतनू गोयल हे बैठकीमध्ये व्यस्त असल्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.स्थानिक मागण्यांचे निवेदन तहसीलदार संजय पवार यांनी स्वीकारले. शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मागण्यांमध्ये निराधारांचे चार महिन्यांचे प्रलंबित मानधन पंधवाड्यात देण्यात येईल असे सांगितले.तसेच राशन कार्ड बनवून देणे, ड यादीत नाव नसल्यास घरकुल बांधून देणे, पंडीत दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत घरे बांधून देणे, वनहक्क कायद्यांतर्गत प्रस्ताव जिल्हा समितीकडे पाठविणे आदी मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.धरणे आंदोलनाप्रसंगी झालेल्या सभेत शिवकुमार गणवीर, हिवराज उके, माधवराव बांते, सदानंद इलमे, शांताबाई यांचे मार्गदर्शन झाले.सदर आंदोलनप्रसंगी जयप्रकाश मसरके, राजू बडोले, माणिकराव कुकडकर, गजानन पाचे, मोहनलाल शिंगाडे, लिलाबाई रामटेके, अल्का सतदेवे, अंजीरा उके, रत्ना इलमे, महानंदा गजभिये, वामनराव चांदेवार, शिशुपाल अटाळकर, मंगेश माटे, ललीता तिजारे, नरेंद्र रामटेके, डी.डी. कानेकर, प्रविण वासनिक, नंदकिशोर रामटेके, गणेश चिचामे, कुसुम राऊत, मोहित देशमुख, ज्ञानीराम नेवारे, गौतम भोयर आदी उपस्थित होते.