गुरांचा आणि माणसांचा दवाखाना एकाच आवारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:01 IST2020-04-29T05:00:00+5:302020-04-29T05:01:07+5:30

नाकाडोंगरी येथील आरोग्य केंद्र २५ गावातील जनतेला आरोग्य सेवा पुरविते. शासनाने १३ कलमी कार्यक्रमांतर्गत या केंद्राला आरोग्य वर्धीनी केंद्राचा दर्जा दिला. आयुष्यमान भारत योजनेच्या १३ प्रकारच्या सुविधा येथे मोफत देण्यात येतात. यामध्ये विविध कर्करोगाचे प्राथमिक निदान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लसीकरण, मानसिक आरोग्य यासह प्रसुतीपूर्व व प्रसूतीपश्चात सेवा दिली जाते. नवजात शिशूंना सुविधा उपलब्ध आहेत.

Cattle and human clinics in the same premises | गुरांचा आणि माणसांचा दवाखाना एकाच आवारात

गुरांचा आणि माणसांचा दवाखाना एकाच आवारात

ठळक मुद्देनाकाडोंगरीतील प्रकार : दुर्गंधीचा त्रास

राहुल भुतांगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : गुरांचा आणि माणसांचा दवाखाना एकाच आवारात असण्याचा अजब प्रकार तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे सुरु असून दुर्गंधीमुळे आरोग्य केंद्रात दाखल रुग्ण त्रस्त झाले आहेत. पशूवैद्यकीय रुग्णालय दुसरीकडे स्थलांतरीत करावे अशी मागणी आहे.
नाकाडोंगरी येथील आरोग्य केंद्र २५ गावातील जनतेला आरोग्य सेवा पुरविते. शासनाने १३ कलमी कार्यक्रमांतर्गत या केंद्राला आरोग्य वर्धीनी केंद्राचा दर्जा दिला. आयुष्यमान भारत योजनेच्या १३ प्रकारच्या सुविधा येथे मोफत देण्यात येतात. यामध्ये विविध कर्करोगाचे प्राथमिक निदान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लसीकरण, मानसिक आरोग्य यासह प्रसुतीपूर्व व प्रसूतीपश्चात सेवा दिली जाते. नवजात शिशूंना सुविधा उपलब्ध आहेत. सामान्य संसर्गजन्य रुग्णसेवाही येथे दिली जाते. त्यामुळे रुग्णालयात दररोज मोठी गर्दी असते. मात्र याच रुग्णालयाच्या आवारात पशूवैद्यकीय दवाखाना आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आपल्या जनावरांना येथे घेऊन येतात.
पशुवैद्यकीय दवाखाण्यात घाण, दवाखान्याचा चारा, शेण सर्वत्र पडून असते. त्यामुळे रुग्णांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी आवाराबाहेर जागा उपलब्ध आहे. त्याठिकाणी स्थलांतरण करता येऊ शकते. याकडे आपण अनेकदा लक्ष वेधले. परंतु दुर्लक्ष होत असल्याचे निरंजन गौपाले यांनी सांगितले.

Web Title: Cattle and human clinics in the same premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.