दुचाकी शाेरूममध्ये कॅशिअरने केली २८ लाखांची अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST2021-07-07T04:44:15+5:302021-07-07T04:44:15+5:30
याबाबत हुसेन फिदवी यांच्याशी संपर्क साधला असता, २० एप्रिलराेजीच याप्रकरणी तक्रार देण्यात आली हाेती. पाेलिसांनी चाैकशीसाठी तब्बल दाेन महिने ...

दुचाकी शाेरूममध्ये कॅशिअरने केली २८ लाखांची अफरातफर
याबाबत हुसेन फिदवी यांच्याशी संपर्क साधला असता, २० एप्रिलराेजीच याप्रकरणी तक्रार देण्यात आली हाेती. पाेलिसांनी चाैकशीसाठी तब्बल दाेन महिने घेतले. मात्र केवळ भांदवि ४०६ कलमान्वयेच गुन्हा नाेंदविला. खरे तर या फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
बाॅक्स
अशी केली फसवणूक
न्यू ईरा शाेरूममध्ये कॅशिअर म्हणून काम करणाऱ्या अरविंद शुल्का आणि किनेकर यांच्याकडे ग्राहकांकडून आलेली रक्कम स्वीकारणे, त्याची दाेन प्रतीत पावती तयार करणे, त्यातील एक ग्राहकाला देणे व दुसरी लेझरबुकमध्ये लावणे हे काम हाेते. आलेली रक्कम कॅशबुकमध्ये नाेंदवून ती शाेरूमच्या बॅंक खात्यात जमा करण्याचे काम त्यांच्याकडे हाेते. मात्र त्यांनी ही रक्कम बॅंकेच्या खात्यात भरली नाही. याबाबत विचारणा केली असता, सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे, नंतर पैसे परत देऊ, असे सांगितले. परंतु त्यांनी रक्कम परत केली नाही. त्यामुळे शेवटी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.