शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बफर क्षेत्रातील प्रतिबंध हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

भंडारा तालुक्यातील गराडा बुज. येथील एक महिला कोरोनाबाधीत असल्याचे पुढे आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कंटेनमेंट क्षेत्र व बफर क्षेत्र घोषीत केले होते. या क्षेत्रातील सर्व मार्ग बंद करून सदर गावांच्या सीमा आवागमनासाठी बंद करण्यात आल्या होत्या. तसेच या गावातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाण्यास व प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील नागरिकांना या क्षेत्रात येण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली होती.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : कंटेनमेंट क्षेत्रातील गराडा बु., मेंढा व बासोरात प्रतिबंध कायम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाबाधीत व्यक्ती आढळल्यानंतर भंडारा तालुक्यातील तीन गावे कंटेनमेंट क्षेत्र आणि १४ गावे बफर क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले होते. आता संबंधित कोरोनाबाधीत रुग्णाचे दोन अहवाल निगेटिव्ह आल्याने बफर क्षेत्रातील प्रतिबंध हटविण्यात आले. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी बुधवारी जारी केले. मात्र कंटेनमेंट क्षेत्रातील गराडा बु., मेंढा, बासोरा या गावांसाठी लागू असलेले प्रतिबंध यापुढे देखील सुरु राहणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.भंडारा तालुक्यातील गराडा बुज. येथील एक महिला कोरोनाबाधीत असल्याचे पुढे आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कंटेनमेंट क्षेत्र व बफर क्षेत्र घोषीत केले होते. या क्षेत्रातील सर्व मार्ग बंद करून सदर गावांच्या सीमा आवागमनासाठी बंद करण्यात आल्या होत्या. तसेच या गावातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाण्यास व प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील नागरिकांना या क्षेत्रात येण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली होती. या गावांमध्ये पोलिसांचा तगडा बंदोब्सत लावून आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी मोहीम राबविण्यात आली.दरम्यान सदर व्यक्तीचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी भंडारा तालुक्यातील बफर क्षेत्रात येणाºया तिड्डी, मकरधोकडा, मानेगाव, बोरगाव बु., नवरगाव, चोवा, उसरीपार, गराडा खु., अर्जुनी जुनी, झबाडा, टेकेपार (पुनर्वसन), सिल्ली), दवडीपार (बा), श्रीनगर (पहेला) या गावांसाठी घालण्यात आलेले प्रतिबंध उठविण्यात आले आहे. मात्र कंटेनमेंट क्षेत्राकरिता लागू करण्यात आलेले प्रतिबंध कायम राहणार आहेत. यामध्ये गराडा बुज., मेंढा, बासोरा या गावांचा समावेश आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.४३० पोलीस अधिकारी - कर्मचाºयांची आरोग्य तपासणीकोरोना प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत जिल्हा पोलीस मुख्यालयात ४३० पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची आरोग्य विभागातर्फे बुधवारी आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. नागरिकांनी ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी त्वरीत प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सध्या १४ व्यक्ती दाखल आहेत. आतापर्यंत ६६७ व्यक्तींच्या घशातील नमुने नागपूर येथे पाठविण्यात आले असून त्यापैकी ६१३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ६७ व्यक्ती दाखल आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी