शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन पूल ठरतोय ‘धोकादायक’

By admin | Updated: September 12, 2016 00:31 IST

कधी काळी राष्ट्रीय महामार्गाची शान असलेला जुन्या महामार्गावर शहापूर ते ठाणा या गावा दरम्यान असलेला ब्रिटीशकालीन पुल अखेरचा श्वास घेत आहे.

पुलाचे कोपरे घसरले : सुरक्षा भिंत गायब, नागरिकांना करावा लागतो जीवघेणा प्रवासशहापूर : कधी काळी राष्ट्रीय महामार्गाची शान असलेला जुन्या महामार्गावर शहापूर ते ठाणा या गावा दरम्यान असलेला ब्रिटीशकालीन पुल अखेरचा श्वास घेत आहे. या ब्रिटीशकालीन पुलाची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. सुमारे ३० ते ३५ वर्षापुर्वी याच पुलावरुन राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक होत होती. मात्र शहापूर ते ठाणा या दोन गावा दरम्यान महामार्गाचे सरळीकरण झाल्यानंतर हा पूल पूर्णत: अडगळीत पडला.राज्यात महाड येथील पूल अचानक वाहून गेल्यानंतर राज्यात ब्रिटीशकालीन व जुन्या पुलाची शासन स्तरावर दखल घेण्यात आली. मात्र या पुलाकडे शासनाचे लक्ष गेले नाही. या पुलाची दाखल घेण्यात आली नाही हे विशेष.धुळे ते कोलकत्ता या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर शहापूर ते ठाणा दरम्यान असलेल्या जुन्या महामार्ग रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्र जवळुन हंगामी वाहणा-या नाल्यावर हा उंच पुल असून या पुलाचे दोन्ही बाजुचे कोपरे घसरलेले आहेत. कोपरे घसरले असल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूचा समतोल बिघडला आहे.पक्के दगड व मुरुमाचे दगड यापासून तयार करण्यात आलेल्या चार मोठ्या पिल्लरावर हा पूल उभा असून ब्रिटीशकालीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना आहे. मात्र सध्या या पुलाची दुर्दशा पाहता या पुलावरुन वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. पुलाच्या सुरक्षा भिंतीचे दगड गायब झालेले आहेत. सुरक्षा भिंतीचे दगड निघाल्यामुळे पुला ओलांडताना कमालीची काळजी घ्यावी लागते.पुलाच्या पिल्लरावर तिन ठिकाणी मोठी झाडे तयार झाली आहेत. झाडाची मुळे पुलामध्ये खोलवर रुजल्याची दिसून येते. याशिवाय पुलाचे कोपरे घसरलेल्या ठिकाणी माती व दगड बाहेर आल्याने या ठिकाणी वनस्पतीची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे कोपरे कुठवर घसरले याचा नेमका अंदाज येत नाही. सध्याच्या राष्ट्रीय महामार्गावरुन याच पुलावरुन नांदोरा टोली, बहुजर बेघर वसाहत, परसोडी पांधनकडे रस्ता जातो. त्यामुळे सहजिकच या पुलावरुन नागरिक आवागमन करतात. तसेच सकाळ, संध्याकाळ फिरायला जाणा-या तसेच सकाळ, सायंकाळ फिरायला जाणा-या नागरिकांना याच पुलावरुन जावे लागते.शाळकरी विद्यार्थी कुतुहलापोटी पुलावरुन खाली वाकुन पाहतात. तसेच पुलाशेजारी शेतीशिवार असल्याने याच पुलावरुन ट्रॅक्टर व इतर वाहने नेली जातात. पुलाच्या दोन्ही भागाकडील कठडे गायब झाल्याने येथे केव्हाही दुर्घटना घडू शकते. महामार्गाचे सरळीकरण झाल्यानंतर या जुन्या महामार्गाच्या रस्त्याकडे व पुलाकडे कुणीही लक्ष दिलेले नाही. धोकादायक ठरु पाहणा-या या ब्रिटीशकालीन पुलाच्या दुरुस्तीकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)सुरक्षा महत्त्वाचीराज्यात घडलेल्या दुर्घटना पाहता या पुलावर दुर्घटना घडू नये याकरिता पुलाच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. शहापूर, नांदोरा टोली व ठाणा ह्या गावातील शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना या पुलावरुन दररोज ये-जा करावी लागते. मात्र या पुलाची दुर्दशा पाहता नागरिकांना सुरक्षीत आवागमन धोकादायक झाले आहे.