पूल देत आहे इतिहासाची साक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 05:00 AM2020-05-11T05:00:00+5:302020-05-11T05:01:12+5:30

स्वातंत्र्यपूर्व काळात दळणवळणाची सोय व्हावी यासाठी ब्रिटिशांनी देशभर रस्ते आणि पुलाचे जाळे विणले. त्यातून त्यांनी आपले साम्राज्य सर्वत्र विस्तारले. नागपूर ते रायपूर या राष्ट्रीय महामार्गावरील भंडारानजिक वैनगंगा नदीवरील पूल याच कारणासाठी उभारण्यात आला. तत्कालीन सीपी अँन्ड बेरार प्रांताचे गर्व्हनर सर मॉन्टेग्यू बटलर यांच्या हस्ते २० जुलै १९२९ मध्ये खुला करण्यात आलेल्या या पुलाला आता ९१ वर्ष पूर्ण होत आले असून तो शंभरीकडे वाटचाल करीत आहे.

The bridge is a testament to history | पूल देत आहे इतिहासाची साक्ष

पूल देत आहे इतिहासाची साक्ष

Next
ठळक मुद्देवैनगंगेचा पूल वारसा नव्वदीपार! : ब्रिटिशकालीन पुलाची ९१ वी वर्षपूर्ती, १९२९ मध्ये पुलाचे उद््घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वैनगंगेवरील ब्रिटीशकालीन पुलाला आता ९१ वर्ष पूर्ण होत आली तरी हा पूल ताठ मानेने उभा आहे. त्याचा कणा अजूनही मोडला नाही. या पुलाच्या शेजारीच काही वर्षांपूर्वी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने दुसरा नवीन पूल बांधला गेला आहे. परंतु, लहान पुलाचे महत्व कमी झालेले नाही. स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या या पुलावरुन सुरक्षेच्या दृष्टीने जड वाहतूक बंद केली असली तरी दुचाकी व पायी वाहतूक सुरू आहे. हा पूल भंडारा जिल्ह्याच्या इतिहासाची साक्ष देत आता शंभरीकडे वाटचाल करीत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात दळणवळणाची सोय व्हावी यासाठी ब्रिटिशांनी देशभर रस्ते आणि पुलाचे जाळे विणले. त्यातून त्यांनी आपले साम्राज्य सर्वत्र विस्तारले. नागपूर ते रायपूर या राष्ट्रीय महामार्गावरील भंडारानजिक वैनगंगा नदीवरील पूल याच कारणासाठी उभारण्यात आला. तत्कालीन सीपी अँन्ड बेरार प्रांताचे गर्व्हनर सर मॉन्टेग्यू बटलर यांच्या हस्ते २० जुलै १९२९ मध्ये खुला करण्यात आलेल्या या पुलाला आता ९१ वर्ष पूर्ण होत आले असून तो शंभरीकडे वाटचाल करीत आहे. हा पूल होण्याआधी व त्यानंतरचा इतिहास मोठा रंजक आहे.
देवगढ राजघराण्यातला गृहकलह शमवण्यासाठी नागपूरच्या रघुजी भोसल्यांनी १७३९ मध्ये उमरेड व पवनी येथील किल्ल्यांचा पाडाव करत भंडाऱ्यावर स्वारी केली. त्यांना वैनगंगा नदी नावांचा (डोंगा) पूल करून ओलांडावी लागली होती. नंतरच्या काळात नदीचे पात्र ओलांडण्यासाठी लाकडी पूल बांधण्यात यायचा. हा लाकडी पूल बांधण्यासाठी मजुरांना मजुरी म्हणून कवड्या दिल्या जायच्या. त्यावेळचे व्यवहार हे कवड्यांमधून व्हायचे. लाकडी पूलावरून या महामार्गावरील वाहतूक व्हायची. पावसाळ्यात नदीला पूर येत असल्यामुळे तो पूल काढून टाकला जाई. या लाकडी पुलावरून स्वामी विवेकानंद यांनी विद्यार्थीदशेत घोडागाडीतून रायपूरपर्यंत प्रवास केला होता, असे जाणकार सांगतात.
प्रत्येक पावसाळ्यात पुलावरील वाहतूक प्रभावित होत असल्याने व दळणवळणाची गैरसोय होत असल्याने ब्रिटीश कंपनीने जिल्हा प्रशासनाला पक्का पूल बांधण्यासाठी पत्र पाठविले होते. दरम्यानच्या काळात सीपी अँन्ड बेरार प्रांतचे गर्व्हनर मॉन्टेग्यू बटलर हे भंडारा येथे शासकीय बंगल्यात उतरले होते. त्या बंगल्यात खांबावरचे पंखे होते. (भंडारा येथील जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक, जिल्हा शल्य चिकीत्सकांचा बंगला ब्रिटीशकालीन आहेत.) त्यावेळी वैनगंगा नदीला पूर आला होता. तेव्हा भंडारा येथील प्रतिष्ठीत नागरिक रावसाहेब जकातदार यांनी गर्व्हनर बटलर यांचा बंगला गाठला. रावसाहेब जकातदार यांनी गर्व्हनर बटलर यांना पुराची स्थिती अवगत करुन दिली. गर्व्हनर बटलर यांनी ती स्थिती पाहताच वैनगंगा नदीवर पूल बांधण्याचे आदेश ब्रिटीश कंपनीला दिले. १९२९ मध्ये हा पूल बांधला गेला. २० जुलै १९२९ ही तारीख पुलाच्या उद््घाटनासाठी निश्चित करण्यात आली. उद््घाटनासाठी गर्व्हनर मॉन्टेग्यू बटलर हे स्वत: आले होते. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात हा पूल दळणवळणासाठी खुला करण्यात आला. या पुलावरून प्रवास करण्यासाठी ब्रिटिशांनी जकात कर लावला होता.

उद्घाटनाच्या वेळी ‘बटलर गो बॅक’च्या घोषणा
२० जुलै १९२९ रोजी वैनगंगेवरील पुलाचे उद््घाटन करण्यात आले. परंतु, या उद््घाटनाला भंडाºयातील कॉंग्रेसच्या मंडळींना निमंत्रण नव्हते. त्यामुळे या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यात आला होता. त्यासाठी भंडारा, गोंदिया, तुमसर, नागपूर येथून आंदोलक भंडाºयात जमले होते. भंडारा येथील आताचा बस डेपो, बस स्टँड व कॉलेज रोड या तीन रस्त्यांवरून आंदोलक निघाले होते. आज अत्यंत गजबलेल्या कॉलेज रोडवर त्याकाळी दाट झाडी होती. जाण्यासाठी लहान रस्ता होता. पोलिसांनी तीनही रस्त्यांवर आंदोलकांना थांबविले होते. 'बटलर गो बॅक' अशा घोषणा त्यावेळी देण्यात आल्या होत्या. त्यामुळेच पोलिसांच्या बंदोबस्तात पुलाचे उद््घाटन करण्यात आले होते.

Web Title: The bridge is a testament to history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी