भंडारा जिल्ह्यात आईला वाचविताना मुलाने गमावले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 15:04 IST2020-05-04T15:03:55+5:302020-05-04T15:04:53+5:30
कुलरजवळून केरकचरा काढताना आईला विजेचा धक्का लागल्याचे पाहताच तिला वाचवण्यासाठी गेलेल्या मुलाचा मात्र विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर येथे सोमवारी पहाटे घडली.

भंडारा जिल्ह्यात आईला वाचविताना मुलाने गमावले प्राण
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कुलरजवळून केरकचरा काढताना आईला विजेचा धक्का लागल्याचे पाहताच तिला वाचवण्यासाठी गेलेल्या मुलाचा मात्र विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर येथे सोमवारी पहाटे घडली.
सकाळी नेहमीप्रमाणे साडेपाचच्या सुमारास अनुसयाबाई तुमन्ने (४५) या घरातील कचरा काढताना कुलरजवळ गेल्या. त्यावेळी कूलर सुरू होता. तिथे अचानक त्यांना विजेचा धक्का बसल्याने त्या ओरडल्या. यावेळी सर्व कुटुंबिय जागे झाले होते. त्यांचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा राजेश बळीराम तुमन्ने (२०) हा त्यांना सोडवायला धावला. मात्र आईला सोडवतेवेळी त्याला विजेचा धक्का लागून तो जागीच ठार झाला. अनुसयाबाई तुम्मने यांना रुग्णालयात दाखल केले आहे.